नि:स्वार्थ संस्थेचा शाळांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:54 PM2019-01-27T17:54:29+5:302019-01-27T17:54:43+5:30

सिन्नर : नि:स्वार्थ सेवा सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते तालुक्यातील दापूर, जांभळीवस्ती, रामोशीवाडी आदी शाळांत शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

Helping the schools of selfless organization | नि:स्वार्थ संस्थेचा शाळांना मदतीचा हात

नि:स्वार्थ संस्थेचा शाळांना मदतीचा हात

Next

सिन्नर : नि:स्वार्थ सेवा सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते तालुक्यातील दापूर, जांभळीवस्ती, रामोशीवाडी आदी शाळांत शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
नि:स्वार्थ संस्थेकडून जिल्हा परिषद दापूर शाळेस कब बुलबूल साहित्य, ५० लेझीम, ढोलताशा, झांज असे २० हजार रूपये किमतीचे साहित्य वितरीत करण्यात आले. जांभळवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना १० हजार रूपये किमतीचे बुट, बॅग्स, पाणी बॉटल, कंपासपेटी, पाटी आदि शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे व पंचायत समिती उपसभापती भाबड यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रामोशीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना २७ हजार रूपये किमतीच्या २५ सायकली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या. दापूर शाळेतील उपशिक्षक गोरक्ष सोनवणे यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांच्या उपस्थितीत दापूर शाळा समितीकडून त्यांचा गौरव करण्यात आला. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकांत कदम यांनी आभार मानले. यावेळी नि:स्वार्थ संस्थेचे अध्यक्ष सुरेश डोंगरे, सदस्य अंकुश सांगळे, माधव डोंगरे, शालेय समितीचे अध्यक्ष योगेश तोंडे, कचरू आव्हाड, मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे, केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके, महेश सोनवणे, सुजाता शेळके, रामोशीवाडीचे मुख्याध्यापक नंदा मरकड आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Helping the schools of selfless organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा