हे स्वर्गीय पित्या... या भूतलावर तुझे राज्य येवो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:48 AM2019-02-10T01:48:53+5:302019-02-10T01:49:08+5:30

‘आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’ अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. यात्रोत्सवाला सुमारे लाखभर भाविकांची उपस्थिती होती.

Heavenly Father ... let your kingdom come on the earth! | हे स्वर्गीय पित्या... या भूतलावर तुझे राज्य येवो !

हे स्वर्गीय पित्या... या भूतलावर तुझे राज्य येवो !

Next
ठळक मुद्देबाळ येशू मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी यात्रोत्सवात भक्तांची प्रभूकडे प्रार्थना

नाशिकरोड : ‘आमच्या स्वर्गीय बापा
तुझे नाव पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही
तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’
अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. यात्रोत्सवाला सुमारे लाखभर भाविकांची उपस्थिती होती.
नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर समोरील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसीय यात्रोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती, तर सेंट झेवियर्स शाळेच्या पाठीमागील मैदानावर मोठा मंडप उभारण्यात आला होता. यात्रोत्सवानिमित्त राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून शुक्रवारीच भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
यात्रोत्सवास प्रारंभ
यात्रोत्सवास शनिवारी पहाटे ६ वाजता इंग्रजीमध्ये सामूहिक प्रार्थनेला सुरुवात झाली. सकाळी ७ वाजता मराठी, ८ वाजता इंग्रजी व ९ वाजता बिशप लुर्ड्स डॅनियल सामूहिक प्रार्थना सांगितली. १० वाजेची प्रार्थना झाल्यानंतर ११ वाजता मुख्य प्रार्थना मुंबईचे कार्डिनल ओझवल्ड ग्रेशस यांनी प्रार्थना घेऊन संदेश दिला. दुपारी ३ वाजेपर्यंत दर तासाला इंग्लिश-मराठी, दुपारी ४ वाजता तामिळी भाषेत, पुन्हा इंग्रजी-मराठी व रात्री ८ वाजता कोकणी भाषेत सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. फादर ट्रेव्हर मिरांडा, फादर लेरॉय रॉड्रिग्ज, फादर लिनस डिमेलो, फादर टेरी क्वाड्रोज, फादर फ्रान्सिस फर्नांडीस, फादर आॅब्रे फर्नांडीस, फादर विन्सी डिमेलो, फादर लिनस डिमेलो, फादर लेरॉय रॉड्रिग्ज, फादर विल्यम डीब्रिटो, फादर लिओन डीक्रुज, फादर अरुण जॉन बॉस्को, फादर स्टीफन घोषाल, फादर इवन डिसूजा,

Web Title: Heavenly Father ... let your kingdom come on the earth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.