आरोग्य  विद्यापीठाच्या आरोग्य बॅँकेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:20 AM2018-06-30T01:20:48+5:302018-06-30T01:21:05+5:30

आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बॅँक योजना सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२९) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

 Health University Launch of Health Bank | आरोग्य  विद्यापीठाच्या आरोग्य बॅँकेचा शुभारंभ

आरोग्य  विद्यापीठाच्या आरोग्य बॅँकेचा शुभारंभ

Next

नाशिक : आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बॅँक योजना सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२९) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.  मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महादेव जानकर, संभाजी निलंगेकर, डॉ. दीपक सावंत यांच्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने सामंजस्य करार करण्यात आला असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रामुख्याने ही योजना असेल. आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंदर्भातील जनजागृती करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक नागरिकांकडून एक किंवा
दोन व्यक्तींची आरोग्य मित्र म्हणून निवड करण्यात येणार असून, त्यांना आजार होऊ नये यासाठी दक्षता  तसेच आरोग्य शिक्षण, शासकीय आरोग्य योजना आणि उपचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांबाबत जनजागृती करतील.
















छायाचित्र आर फोटोवर २९ एमयुएचएस

Web Title:  Health University Launch of Health Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.