नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:34 PM2018-08-17T14:34:25+5:302018-08-17T14:36:25+5:30

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पुर्व भागातून एक्झीट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवश्यावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरूवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८१४ मिली मीटर

Hazardous rain in Nashik district! | नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी !

नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी !

Next
ठळक मुद्देपाणी साठ्यात वाढ : १२ धरणातून विसर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला

नाशिक : तीन आठवड्याहूनही अधिक काळ दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात सर्वदूर फेरआगमन झाल्याने सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले असून, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला आहे. गुरूवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले तर धरणाच्या साठ्यातही कमालिची वाढ झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून १२ धरणातून पाण्याचे विसर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पुर्व भागातून एक्झीट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवश्यावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरूवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८१४ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात १०१ मिली मीटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेवर येथे पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे आॅगष्टच्या दुसºया आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडलेल्या नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड, देवळा, बागलाण, चांदवड या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेला मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर धरणाच्या साठ्यातही कमालिची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये ६८ टक्के जलसाठा झाला असून, त्यातील पाच धरणे शंभर टक्के फुल्ल झाल्याने त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने आळंदी, भावली, हरणबारी, केळझर, वाघाड यांचा समावेश आहे. पावसाच्या सर्वदूर हजेरीमुळे गंगापूर धरण समुहात ९२ टक्के, पालखेड धरण समुहात९३, दारणा सुमहात ८० टक्के, गिरणा खोºयात ४० टक्के पाणी साठले आहे. काही धरणे ९० टक्क्यापेक्षा अधिक भरल्यामुळे पाटबंधारे खात्याने त्यातून विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गंगापूर, वाघाड, दारणा, पालखेड, करंजवण, पुणेगाव, भावली, वालदेवी, चणकापूर, हरणबारी, केळझर व नांदुरमध्यमेश्वर धरणाचा समावेश आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Hazardous rain in Nashik district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.