त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला तीन महिने पर्यटकांना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:15 PM2019-07-09T14:15:16+5:302019-07-09T14:15:22+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटकांचे व गिर्यारोहकांचे आकर्षण स्थान असलेले हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली.

 Harihar fort of Trimbakeshwar taluka is closed for three months for tourists! | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला तीन महिने पर्यटकांना बंद !

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला तीन महिने पर्यटकांना बंद !

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी नाशिक यांनी जिल्ह्यातील पर्यटन धार्मिक गिर्यारोहण आदी स्थळांना स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जावे असा आदेश देण्यात आला आहे. याच निर्णयाचा आधार घेउन त्र्यंबक तालुक्यातील हरिहर गड पर्यटकांना प्रवेशासाठी तीन मिहने बंद केला आहे.



लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर :

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटकांचे व गिर्यारोहकांचे आकर्षण स्थान असलेले हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी गड हरिहरगड मांगीतुंगी साल्हेर मुल्हेर पांडवलेणी चामरलेणी सितागुंफा पंचवटी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आदी पाहण्यासाठी अनुभवण्या साठी दर्शनासाठी भाविक पर्यटक गिर्यारोहक आदींचे आकर्षण स्थाने आहेत.यासाठी भारतासह जगभरातुन भाविक पर्यटक गिर्यारोहक येत असतात. तथापि तयांना त्या स्थळांच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नसते.यासाठी स्थानिक प्राधिकरण
यांनी खबरदारी घ्यावी. यामध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषद तहसिलदार ग्रामपंचायत नगरपरिषद आदींनी गर्दी अफवा पसरविणे चेंगराचेंगरी आपत्ती विषयक भितीचे वातावरण निर्माण करणे यासाठी स्थानिक प्राधिकरणाने उपाय योजना करावी.असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.
हरिहर किल्ला आजही सुस्थितीत असुन तेथील हवामान थंड आहे. समुद्र सपाटीपासुन ३७७६ फुट उंच आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर वैतरणा मार्गे घोटी इगतपुरी मार्गावर टाके हर्ष किंवा त्याचा पुढचा निरगुड पाडा येथुन हरिहर किल्ला लांबुनच पर्यटक गिर्यारोहकांचे लक्ष वेधुन घेतो. मात्र या किल्ल्याच्या पाय-या अत्यंत अरु ंद असुन एका वेळेस एकच माणूस चढेल व उतरेल अशा हिशेबाने बांधण्यात आल्या आहेत. मागच्यारविवारी हरिहर गडावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होउन गडावर तर गर्दी झालीच पण खाली व वर चढण्यास एकच गर्दी झाली होती.सुदैवाने चेंगराचेंगरी झाली नाही. यासाठी मान्सुन काळात हरिहर गडावर जाण्यास आपत्ती व्यवस्थापन उपाय योजना अंतर्गत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
(08हरिहर गड)

Web Title:  Harihar fort of Trimbakeshwar taluka is closed for three months for tourists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.