हॅपी न्यू इयर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:33 AM2019-01-01T02:33:29+5:302019-01-01T02:35:13+5:30

‘गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे.... भिजलेली आसवे झेलून घे... सुख-दु:ख झोळीत साठवून घे... आता उधळ सारे हे आकाशी, नववर्षाचा आनंद भरभरून घे...’ असे मनोमनी म्हणत नाशिककरांनी मावळत्या दिनकराच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचा जल्लोष केला.

Happy new year ... | हॅपी न्यू इयर...

बोचऱ्या थंडीत सरत्या वर्षाला निरोप देत तरुणाईने जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या वर्षाचे स्वागत केले.

Next
ठळक मुद्देजल्लोषात स्वागत : रेस्टॉरंट फुललेसांस्कृतिक कार्यक्रमाच्या मैफली रंगल्या

नाशिक : ‘गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे.... भिजलेली आसवे झेलून घे... सुख-दु:ख झोळीत साठवून घे... आता उधळ सारे हे आकाशी, नववर्षाचा आनंद भरभरून घे...’ असे मनोमनी म्हणत नाशिककरांनी मावळत्या दिनकराच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचा जल्लोष केला.
वर्ष नवे, पर्व नवे, नव्या आशा अन् नवी स्वप्ने बघत तरुणाईने सोमवारी (दि.३१) नवसंकल्प सोडला. वर्षाच्या अखेरचा सूर्यास्त होताच तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघाली. सरत्या वर्षात काय कमावलं, काय गमावलं याचे गणित न जुळवता केवळ नव्या आकांक्षेने नववर्षाचे स्वागताचा उत्साह सळसळत्या तरुण रक्तात संचारलेला पहावयास मिळाला.
‘थर्टि फर्स्ट’च्या निमित्ताने सायंकाळपासून शहराचा नूर पालटलेला दिसून आला. मागील तीन दिवसांपासून पडणाºया कडाक्याच्या थंडीच्या तुलनेत अल्पसा का होईना सायंकाळी दिलासा मिळाला. कारण किमान तापमान दोन ते अडीच अंशांनी वाढलेले होते. बोचºया थंडीत तरुणाईने जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या वर्षाचे स्वागत केले. गोदापार्क परिसरात संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच तरुण-तरुणींचे समूह एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर एकमेकांना नववर्षाचे संकल्प सांगण्यात येत होते.

तरुणाईच्या आनंदाला उधाण
शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड या परिसरात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. काहींनी चहाच्या कट्ट्यावर येत गप्पांचे फड रंगवून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भागातील चाट भांडार, कॉफीशॉप, रेस्टॉरंट गजबजल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी ज्या मित्र-मैत्रिणींचा ३१ डिसेंबरला वाढदिवस होता त्यांचा वाढदिवसही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला.

Web Title: Happy new year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.