मानोरीत खरीप हंगामातील पिकावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:56 PM2019-06-18T21:56:21+5:302019-06-18T21:56:58+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१८) ला येवला कृषी विभाग अंतर्गत खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या मशागतीच्या अधिक माहितीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Guidance on Manorari kharif season crop | मानोरीत खरीप हंगामातील पिकावर मार्गदर्शन

खरीप हंगामातील पिकाबाबत मार्गदर्शन करताना अधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देजेव्हडी खोल नांगरणी केली तेव्हडी फायदेशीर राहणार

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१८) ला येवला कृषी विभाग अंतर्गत खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या मशागतीच्या अधिक माहितीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कृषीतज्ञ नाईकवाडे आणि कृषी सहायक वाडेकर यांनी शेतकऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले. हुमणी कीड ही सर्वच पिकातील मुळे खाण्याची कामे करते, सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जमिनीत पाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प प्रमाणात आहे. खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीआधी शेतकरी वर्गाने आपल्या शेतीची नांगरणी शक्य होईल तितक्या खोलवर करणे गरजेचे आहे. जेव्हडी खोल नांगरणी केली तेव्हडी फायदेशीर राहणार असून जमिनीत असलेले अनेक प्रकारची किडे, अळया या खोल नांगरणीमुळे बाहेर पडतात आणि या अळ्या, किडे बाहेर पडल्यास शेतातील पिके दर्जेदार येण्यास मदत होते.
नांगरणी केल्यास शेतीला काही दिवस विश्रांती देणे गरजेचे आहे. मका, सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर शेतात सापळा लावणे गरजेचे आहे. पीक मोठे झाल्यानंतर त्यावर फिरणाºया विविध प्रकारच्या पाकोळ्या, अळ्या, किडे या सापळ्यात अडकून जात असतात.
तसेच जर शेतकरी घरच्याघरी जुन्या पिकाचे नवीन बी तयार करणार असल्यास त्या बियावर योग्य ती प्रक्रि या करून २४ तासाच्या आतच त्या बियाणांची लागवड करणे गरजेचे असते. वेळोवेळी सोयाबीन पिकासारखी मक्याच्या पिकांवर देखील औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच सोयाबीन पिकाची पेरणी ही ट्रॅक्टरच्या सहायाने केल्यास योग्य प्रकारे त्याची लागवड होत असते. यात शेतकरी वर्गाने ही लागवड करताना ठराविक अंतरावर सोयाबीनच्या एका सरीत पेरणी न करता ती तशीच मोकळी ठेवल्यास पाऊस उशिरा जरी थोड्या फार प्रमाणात आला तर तर पाणी त्या मोकळ्या सरीत गेल्यास शेजारील सोयाबीनच्या सरींना त्याचा फायदा होऊन सोयाबीन पीक उन्हात हिरवेगार आणि उत्पादन देखील वाढण्यास मदत होणार असल्याचे कृषीतज्ञ नाईकवाडे यांनी यावेळी कृषी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले.
 

Web Title: Guidance on Manorari kharif season crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी