शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:54 AM2018-12-01T00:54:51+5:302018-12-01T00:55:21+5:30

शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे.

 Growing apartments in the city are planted on trees | शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर

शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर

Next

इंदिरानगर : शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे. ही कत्तल होत असताना नियमावलीप्रमाणे प्रत्येक अपार्टमेंटच्या जागेत पाच झाडे लावण्याची सक्ती करण्यात आल्यानंतरही त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सीमेंटच्या जंगलात वातावरण चांगले तापू लागले आहे. काही अपार्टमेंटमध्ये केवळ शोभेची झाडे लावून नियम पाळले जात असल्याचा देखावा केला जात असून, त्यामुळे मूळ उद्देशाला खो बसत आहे
इंदिरानगरसह परिसरात बंगल्यांच्या जागी नवनवीन अपार्टमेंट आणि जुन्या अपार्टमेंट नूतनीकरणामुळे वृक्षांवर कुºहाडी मारल्या जात आहेत. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणावर परिणाम होत आहे. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीचे टुमदार बंगले आणि जमिनीवर उभ्या राहणाºया नव्या सोसायट्यांमुळे हा प्रकार सुरू झाला आहे. यामध्ये बंगल्याच्या परिसरात त्याकाळी लावलेल्या जुन्या विविध वृक्षांवर कुºहाड मारली जात असून, वाढती लोकसंख्या व जागेच्या कमतरतेमुळे उपनगरमधील प्रत्येक जुन्या वसाहतीत तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या जुन्या अपार्टमेंटला नूतनीकरण करण्याचे वेध लागले आहेत. बंगल्याच्या ठिकाणी आकर्षक आणि वेगवेगळ्या सुविधा असलेल्या अपार्टमेंट उभारल्या जातात त्यामुळे सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची जुनी घरे, बंगले नवीन अपार्टमेंटपुढे फिके पडत चालेले आहेत.  अशातच जुन्या अपार्टमेंट देखभालीचा खर्च वाढल्याने शहर परिसरात बंगल्याच्या जागी अपार्टमेंट आणि जुन्या अपार्टमेंटचे नूतनीकरण असा धडाका सुरू झाला आहे. परंतु हे करीत असताना महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन करीत सर्रासपणे वृक्षांवर कुºहाड मारली जात आहे. त्यामुळे वृक्षांच्या घटत्या संख्येने पर्यावरणावर परिणाम होत आहे.
शहरात कोणत्याही इमारतीचा प्लॅन मंजूर करताना नगररचना विभागाच्या वतीने बांधकाम व्यावसायिकाकडून आगाऊ अनामत रक्कम स्वीकारली जाते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना किमान पाच झाडे लावण्यात आल्याचा पुरावा संबंधित विभागाला सादर केल्यानंतर ती अनामत रक्कम परत मिळते. यासाठी नगररचना विभागाच्या कर्मचाºयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री करणे आवश्यक असते. बांधकाम व्यावसायिकाने झाडांची लागवड केली नसेल तर आधी भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.
 आजपर्यंतचा नगररचना विभागाच्या कारभारातील नोंदी पाहिल्या तर बहुसंख्य नोंदणी केलेल्या विकासकांनी त्यांच्या इमारतीच्या आवारात वृक्षांची लागवड फक्त कागदोपत्रीच केलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यापलीकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुळात अशा बांधकाम करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी सूचनाही या नियमात आहे. परंतु त्याकडे डोळेझाक केली जात असल्याने अनामत रक्कम जप्त होण्यापलीकडे काहीच कारवाई होत नसल्याने बांधकाम करणारेही निर्धास्त झाले आहेत.
शोभिवंत वृक्षांचा मोह टाळावा
विकास साधताना पर्यावरणपूरक प्रजातीच्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांच्या मुळावर घाव घातले जात आहेत. वृक्षतोड केल्यानंतर शहर व परिसरात पर्यावरणपूरकच वृक्षाच्या जातीची रोपे लावण्याची गरज आहे. वड, पिंपळ, कडुनिंब, बाभूळ, चिंच, आंबा यांसारख्या भारतीय जातीच्या रोपांची लागवड केल्यास पर्यावरणाचे खºया अर्थाने संवर्धन होऊन पक्ष्यांना निवारा व खाद्य उपलब्ध होण्यास मदतच होईल. त्यामुळे सोसायट्यांनी वृक्षारोपण करताना शोभेच्या झाडांचा मोह टाळण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Web Title:  Growing apartments in the city are planted on trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.