दर्जासाठी द्राक्षांना पेपरचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:11 AM2018-01-04T00:11:42+5:302018-01-04T00:14:53+5:30

वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे.

Graphene Paper Cover for quality | दर्जासाठी द्राक्षांना पेपरचे आच्छादन

दर्जासाठी द्राक्षांना पेपरचे आच्छादन

googlenewsNext
ठळक मुद्देबहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादीत करणाºया द्राक्षबागायुरोप रशिया, चायना, बांगलादेश व इतर देशात द्राक्ष निर्यात करण्याचा दिंडोरी तालुक्याचा नाव लौकिक

वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे.
दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असुन यापैकी बहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादीत करणाºया द्राक्षबागा आहेत. युरोप रशिया, चायना, बांगलादेश व इतर देशात द्राक्ष निर्यात करण्याचा दिंडोरी तालुक्याचा नाव लौकिक आहे. दरम्यान निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यापेक्षा द्राक्ष निर्यात करताना अनेक चाळणी प्रक्रि येच्या माध्यमातुन उत्पादकाना जावे लागते. द्राक्षातील साखरेचे प्रमाण, आकारमान रंग वजन दर्जा याकडे विशेष लक्ष उत्पादकांना द्यावे लागते. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव व्हावा याकरीता सध्या द्राक्ष घडांना पेपर आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे. एका एकर क्षेत्रात आच्छादनासाठी इंग्रजी पेपरची ३० ते ४० बंडल लागतात. एका बंडलची किमत २०० रु पये असुन पेपर लावण्याची मजुरी एकरी दहा हजार इतकी आहे. तसेच मणी काढण्याची मजुरी एकरी ५ ते ७ हजार रु पये आहे. पेठ , सुरगाणा, ननाशी भागाबरोबर स्थानिक मजुरां कडुन हे काम करवुन घेण्यात येते. अशी माहिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक जयवंतराव देशमुख यानी दिली. निर्यात होणाºया द्राक्षांचा रंग हिरवा असावा लागतो. पेपर आच्छादन केले तरच हा रंग टिकुन राहतो. त्यामुळे १८ ते २० ब्रिक्स (साखरे चे) प्रमाण राहुन नैसर्गीकपणा टिकुन राहतो. दरम्यान एक महीन्याच्या कालावधी पर्यंत आच्छादन ठेवावे लागते. दरम्यान स्थानिक ठिकाणाबरोबर परराज्यात द्राक्षाविक्र ी करावयाची असल्यास पिवळसर रंगाची द्राक्षे विक्रसाठी योग्य समजली जातात. त्यात साखरेचे प्रमाण २२ ते २४ असावे लागते. अशी माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. निर्यातीसाठी १६ ते २० इतके आकारमान आवश्यक असते निर्यातीसाठी ५ किलो द्राक्षा चे नमुने तपासणीसाठी हैदराबाद, पुणे ठाणे येथे पाठविण्यात येतात. यशस्वी चाचणी अहवालाचा रिपोर्ट सहाव्या दिवशी येतो. त्यानंतर निर्यात प्रक्रि या सुरू होते .अशी माहिती उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली.
 

Web Title: Graphene Paper Cover for quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.