द्राक्ष, कांद्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:46 PM2018-03-15T22:46:09+5:302018-03-15T22:46:09+5:30

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

Grape, onion danger | द्राक्ष, कांद्याला धोका

द्राक्ष, कांद्याला धोका

Next
ठळक मुद्देढगाळ वातावरण शेतकरी धास्तावले, गव्हालाही भीती

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी चार पैसे मिळतील या आशेत असताना ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आठ ते दहा दिवसांपासून द्राक्षांची आवक घटल्याने बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. बेभाव विकणारी द्राक्षे किमान ३५ ते कमाल ४० रु पये विकली जात आहेत. मात्र द्राक्ष सेटिंगच्या वेळी पाऊस पडला होता. त्यामुळे गळ आणि कुज झाल्याने उत्पादन घटले आहे. पर्यायाने बाजारपेठेत द्राक्ष आवक नसल्याने दोन रुपये जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी ढगाळ वातावरणामुळे व्यापारी भाव कमी करतात किंवा अचानक पाऊस पडला तर तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
कांदा आणि गहू पीक ९० टक्के काढणीच्या प्रतीक्षेत असल्याने ढगाळ वातावरण आणि पावसाची भीती यामुळे पूर्ण वाया जाऊ शकते. कांदा नाशवंत असल्याने खराब हवामानातसुद्धा पिकावर परिणाम होतो. पात करपून जाते, शिवाय मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जमिनीत कांदा पोसत नाही त्यामुळे उत्पादनात घट होत असते. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काही प्रमाणात शेतात कांदा काढून टाकला आहे. साठवणीचा कालावधी पुढे असल्याने शेतात पोळ घालून पसरलेला कांदा खराब होऊ शकतो. अस्मानी, सुलतानी संकटकधी सरकारी धोरण तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयाचे सातत्याने कंबरडे मोडत आहे. वाढते कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांना लागणार पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.वातावरणात सतत बदल होत असल्याने शेतात कोणता शेतमाल पिकवावा आणि त्याचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. द्राक्ष, कांदा, गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून घेण्याची भीती वाटत आहे.
- दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे

Web Title: Grape, onion danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक