ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:11 AM2017-11-22T01:11:56+5:302017-11-22T01:14:26+5:30

जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागांत हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्षबागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने वातावरण साफ होण्यास मदत झाली.

In the grape crisis with cloudy weather | ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात

ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यात सोमवारी अचानक ढगाळ हवामान अवकाळी पावसामुळे आधीच द्राक्षबागा संकटात वातावरणात अचानक बदल

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागांत हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्षबागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने वातावरण साफ होण्यास मदत झाली.
सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच द्राक्षबागा संकटात सापडल्या होत्या.
त्यात आॅक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था आल्यानंतर सोमवारी अचानक ढगाळ हवामान होऊन पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यांत झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण काय? याची हवामान खात्याकडून माहिती घेण्यासाठी कृषी विभाग फारसा प्रयत्नशील नसल्याचे दिसले. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असतानाच पावसाचा शिरकाव झाल्याने वातावरणात अचानक बदल झाला. त्यामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये, म्हणून शेतकºयांना द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. जिल्ह्णात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजर १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्टर तसेच चांदवड तालुक्यात तीन हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कंटेनरमध्ये घट
गेल्या वर्षी २० नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागांतील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांना अवकाळीचा फटका बसल्याने आतापर्यंत केवळ १४ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होऊ शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: In the grape crisis with cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.