गोवर-रु बेला लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:59 PM2019-01-19T19:59:18+5:302019-01-19T20:00:21+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात शहरासह तालुक्यातील ५९७१७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या आरोग्य विभागापुढे होते. त्यापैकी ५९०४७ पर्यंत लाभार्थ्यांचे ...

GOVER-RU BELLA vaccination aims to complete! | गोवर-रु बेला लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण !

गोवर-रु बेला लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण !

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात ९९ टक्के काम केल्याचे समाधान

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात शहरासह तालुक्यातील ५९७१७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या आरोग्य विभागापुढे होते. त्यापैकी ५९०४७ पर्यंत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पुर्ण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर शहरात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीत व त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ५५९२ पैकी ५५४० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. म्हणजे ९९ टक्के उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. ही आकडेवारी दि. १७ जानेवारी २०१९ ची असल्याची माहिती रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदा बर्वे यांनी दिली.
तालुक्यात गोवर-रु बेला लसी करणाची मोहीम उपजिल्हा रु ग्णालय, त्र्यंबकेश्वर यांनी पालिका हद्दीत म्हणजे त्र्यंबकेश्वर शहरात तर तालुका आरोग्य विभागाने १२४ गावात व ८४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत राबविण्यात आली.
त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात आता उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी आता अगदी थोडे लाभार्थी असुन त्यांचेही लसीकरण लवकरच पुर्ण होईल. असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: GOVER-RU BELLA vaccination aims to complete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य