देवरगावी रंगला पालखी सोहळा

By admin | Published: July 10, 2014 10:05 PM2014-07-10T22:05:52+5:302014-07-11T00:17:53+5:30

देवरगावी रंगला पालखी सोहळा

Goddess Palakhi Sokal | देवरगावी रंगला पालखी सोहळा

देवरगावी रंगला पालखी सोहळा

Next

 

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चांदवड तालुक्यातील देवरगावी श्री हरेकृष्ण महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील मनमाड, मालेगाव, चांदवड, कळवण येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मनमाड : येथील आठवडे बाजारातील बालाजी विठ्ठल मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर आदिंसह विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी भाविकांची गर्दी होती.
श्री विठ्ठलाची महाअभिषेक पूजा, महाआरती, दुपारी रथयात्रा तसेच श्री विठ्ठलाची पालखी, दिंडी सोहळा व भजन आदि कार्यक्रम झाले. आठवडे बाजारातील श्री बालाजी विठ्ठल मंदिरातून टाळ-मृदंगाच्या गजरात पांडुरंगाची रथयात्रा काढण्यात आली. विठ्ठल मंदिरातही पूजा होऊन पारंपरिक पद्धतीने स्वतंत्ररीत्या पालखी काढण्यात आली. कलावती आई मंदिरात व शिवाजीनगरातील संत गजानन महाराज मंदिरात आषाढी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
चांदवड : येथील आबड लोढा- जैन महाविद्यालयात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन होते.
कविवर्य खलील मोमीन यांनी सांगितले की, संत साहित्य हे सत्य, शिव व सुंदर यासारख्या मानवी मूल्यांनी संपन्न आहे.
पिंपळगाव बसवंत : चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा जमला होता. चांदवड तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे श्रीक्षेत्र देवरगावी श्री हरेकृष्ण महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी हजारो
भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. दुपारी १ वाजता पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण उभे रिंगण, सांप्रदायिक खेळ, रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सुजित महाराजांनी यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते. वडनेरभैरव, चांदवड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. (लोकमत चमू)

Web Title: Goddess Palakhi Sokal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.