गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:32 AM2018-10-12T00:32:18+5:302018-10-12T00:32:48+5:30

पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली.

Godavari, passenger cancellation; Passengers' arrival | गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरीत मेगाब्लॉक : काही गाड्यांची वेळ बदलली

नाशिकरोड : पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली.
घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस (अप आणि डाउन) रद्द करण्यात आली होती, तर मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गुरुवारपासून मंगळवारपर्यंत (१६ आॅक्टोबर) रद्द करण्यात आली आहे, तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही सोमवार (१५ आॅक्टोबर)पर्यंत रद्द करण्यात आली आहे. एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस एक तास, एलटीटी-मुजफ्फरपूर पवन एक्स्प्रेस- दीड तास, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस व एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावत होत्या.
शुक्रवार (१२ आॅक्टोबर) लोकमान्य टिळक गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी सकाळी ११ एवजी दुपारी १ वाजता, लोकमान्य टिळक गोरखपूर सुपरफास्ट गाडी पावणेदोनला सुटणार आहे. मुंबई पटणा गाडी मुंबईहून सकाळी ११ एवजी दुपारी दीड वाजता, दादर -जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दादरहून दुपारी दो़नएवजी २.५० वाजता सुटेल. एलटीटी-काजीपेट रेल्वे साडेअकरा ऐवजी दुपारी दोन वाजता, पनवेल गोरखपूर गाडी पनवेलहून सायंकाळी ६ ऐवजी रात्री नऊला सुटणार आहे. इगतपुरी रेल्वेस्थानकावर एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस दुपारी २.५५ पासून सायंकाळी ४.२० पर्यंत व एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस दुपारी ३.२० पासून ४.४५ पर्यंत थांबून २२पुढे रवाना होणार आहे.

Web Title: Godavari, passenger cancellation; Passengers' arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.