लग्नाला चला, तुम्ही विमानाने चला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 06:58 PM2018-05-20T18:58:56+5:302018-05-20T18:58:56+5:30

नाशिक -  डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिधी अक्षरश: घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे एका व्यवसायिकांच्या संघटनेने चार्टर प्लेनने गोवा सहल निश्चित केली असून तीही प्रति प्रवासी दोन हजार रूपये भाड्यात!

Go to marriage, you fly by plane | लग्नाला चला, तुम्ही विमानाने चला...

लग्नाला चला, तुम्ही विमानाने चला...

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांसाठी स्पर्धा:नाशिकमध्ये विमान कंपन्यांच्या घिरट्या

नाशिक -  डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिधी अक्षरश: घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे एका व्यवसायिकांच्या संघटनेने चार्टर प्लेनने गोवा सहल निश्चित केली असून तीही प्रति प्रवासी दोन हजार रूपये भाड्यात!
विमान प्रवास हा तसा धनिकांसाठी मानला गेला असला तरी आता मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग देखील विमान प्रवास करू लागला आहे. अर्थात, कामानिमित्ताने किंवा सहलीसाठी सुध्दा प्रवास केले जातात. काही कंपन्या हे कॉमन मॅनसाठीच असल्याचे सांगत परवडणारे प्रवास भाडे घेऊन देखील सोय उपलब्ध करतात. परंतु आता केंद्र आणि त्या पाठोपाठ राज्य सरकारचे हवाई धोरणही शिथील होत गेले आणि उडान मुळे तर विमान कंपन्यांना देखील संधी उपलब्ध झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेपूर्वीही नाशिकमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी विविध व्यवसायिक संघटनांशी संपर्क साधून प्रयत्न करीत होते. परंतु पर्यटक आणि उद्योजक व्यावसायिकांच्यापलिकडे जाऊन विविध व्यवसायिक संघटना आणि व्यक्तीगत पार्ट्यांना भेटून विमान सेवेच्या विविध आॅफर्स देण्यास तयार झाल्या आाहेत.
देशभरात कुठेही लग्न सोहळ्यासाठी जायचे असल्यास चार्टर बोर्इंग उपलब्ध करून दिले जाईल, इतकेच नव्हे तर कुठे परिषद किंवा अगदी सहलीसाठी जायचे असेल तरीही अशाप्रकारची सेवा नाशिकमधून कुठेही विशेषत: विमानतळ असलेल्या ठिकाणी नेण्याची तयारी संबंधीत कंपन्या अत्यंत अल्प दरात दाखवत आहेत. नाशिकच्या एका व्यवसायिक संघटनेने कामाचा ताण हलका करण्यासाठी आपल्या दीडशे सदस्यांची सहल गोव्यास नेण्याची तयारी दर्शविली असून त्यामुळे कंपनीने प्रति प्रवासी दोन हजार ते एकवीसशे अशा दरात त्यांना गोव्यासाठी चार्टर प्लेन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे हवाई प्रवास करू इच्छीणाऱ्यांसाठी सध्या तरी अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.

Web Title: Go to marriage, you fly by plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.