नाशिक कारखाना, सेंट्रल गोदावरीला द्या

By admin | Published: August 4, 2015 11:32 PM2015-08-04T23:32:01+5:302015-08-04T23:32:56+5:30

पॅकेजशिष्टमंडळचे वित्तमंत्र्यांना साकडे

Give to Nashik factory, Central Godavari | नाशिक कारखाना, सेंट्रल गोदावरीला द्या

नाशिक कारखाना, सेंट्रल गोदावरीला द्या

Next

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तसेच सेंट्रल गोदावरी बॅँकेलाही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना राष्ट्रीयीकृत बॅँकेप्रमाणेच समान व्याज आकारणी करण्याचा निर्णय लागू करावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि.४) नाशिकच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.
सेंट्रल गोदावरी बॅँक ही सेंट्रल बॅँकेच्या अखत्यारित येत असून, सेंट्रल बॅँकेच्या काही शाखांना सात टक्के दराने तर काही शाखांना १० टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना तो सेंट्रल गोदावरी बॅँकेला बारा ते साडे बारा टक्के दराने कर्ज पुरवठा करावा लागत असल्याने तो सेंट्रल गोेदावरी बॅँकेला आणि शेतकऱ्यांनाही परवडत नाही. त्यामुळे सेंट्रल बॅँकेने त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्वच बॅँकांसाठी समान दराने कर्जपुरवठा करावा, अशी मागणी सेंट्रल गोदावरी कृषक बॅँकेच्या वतीने करण्यात आली.
तर नाशिक सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सुमारे ८४ कोटी कर्ज व त्याचे व्याज मिळून १०० कोटींच्या घरात देणे असून, त्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला नाशिक साखर कारखान्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजना लागू करण्याची मागणी नाशिक साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने केली. यावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांंना समान दराने कर्जपुरवठा करण्याची सूचना करण्यात येईल.
तसेच नासाकासाठी नाबार्डच्या माध्यमातून विशेष अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवीदास पिंगळे, भाजपा नगरसेवक व सेंट्रल गोेदावरीचे संचालक दिनकर पाटील, रामदास चव्हाण आदिंचा शिष्टमंडळात समावेश होता. (प्रतिनिधी)
मालेगावी तुरळक पाऊस
मालेगाव : शहरात मंगळवारी सकाळपासून तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते तर सर्वत्र रस्ते ओले झाले होते. या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Give to Nashik factory, Central Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.