गॅस गळती होऊन स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:55 PM2019-02-20T12:55:13+5:302019-02-20T12:55:27+5:30

दिंडोरी: तालुक्यातील धाऊर येथे चौधरी वस्तीवर गॅस गळती होऊन रात्री १०.३०च्या सुमारास स्फोट झाल्याने चौधरी कुटुंबातील पती पत्नी व मुलगा व पुतण्या जळुन ठार झाल.

Gas leak blast, four killed in one family | गॅस गळती होऊन स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे ठार

गॅस गळती होऊन स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे ठार

Next

दिंडोरी: तालुक्यातील धाऊर येथे चौधरी वस्तीवर गॅस गळती होऊन रात्री १०.३०च्या सुमारास स्फोट झाल्याने चौधरी कुटुंबातील पती पत्नी व मुलगा व पुतण्या जळुन ठार झाल. मुरलीधर हरी चौधरी (३२), कविता मुरलीधर चौधरी (३०), तुषार मुरलीधर चौधरी (१०) व नयन कैलास चौधरी (८) अशी मृतांची नावे आहेत. चौधरी कुटूंब धाऊर वस्तीच्या शिवारात वास्तव्यास होते. रात्री सर्व झोपी गेले असता अचानक गॅस सिलींडरमधून गळती सुरू झाली. मात्र हे कोणाच्याच लक्षात आले नाही. घरात दिवा सुरू असल्यामुळे क्षणात सिलींडरने पेट घेतला. यात घरानेही पेट घेतल्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झाला.

Web Title: Gas leak blast, four killed in one family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक