माहेश्वरी समाजातर्फे गणगौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:40 AM2019-04-26T00:40:19+5:302019-04-26T00:40:36+5:30

माहेश्वरी समाजाच्या महिलांनी प्रथेप्रमाणे सोळा दिवस गणगौर सण उत्साहात साजरा केला. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

 Ganges by Maheshwari Samaj | माहेश्वरी समाजातर्फे गणगौर

माहेश्वरी समाजातर्फे गणगौर

Next

नाशिकरोड : माहेश्वरी समाजाच्या महिलांनी प्रथेप्रमाणे सोळा दिवस गणगौर सण उत्साहात साजरा केला. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
गणगौर म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्या पवित्र नात्याचे स्मरण. यामध्ये महिला आपल्या पतीच्या आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून गौरची पूजा व उपवास करतात. नवविवाहित मुली या सणाला माहेरी येऊन गौरचे उद्यापन करतात.  गणगौर हा सण माहेश्वरी समाजात १६ दिवस साजरा केला जातो. या सोळा दिवसांत माहेश्वरी महिला गौरीचे मुखवटे घेऊन लोकगीत गात मंदिरापासून परिसरात फेरी मारतात.
गणगौर सणामध्ये देवळालीगाव गणगौर महिला मंडळाच्या छाया भट्टड, दीपा पुरोहित, मंजू मंत्री, नितीका मंत्री, श्वेता कलंत्री, कल्पना कंलत्री, शीतल भट्टड, हेमा पुरोहित, मीनल बिहाणी, वैशाली मालाणी, सुनंदा राठी, मंगल सोमाणी, सरिता नावंदर, कोमल लहाड, चेतना लहाड, सीमा मणियार, मोना मालपाणी आदी सहभागी झाल्या होत्या. गणगौर सणाची सांगता झाली.

Web Title:  Ganges by Maheshwari Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.