गंगापूररोडवरील व्यावसायिकावर टोळक्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:02 PM2018-03-03T16:02:52+5:302018-03-03T16:02:52+5:30

सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन मोटारीतून आलेल्या या टोळक्याने गैरकायदानुसार गर्दी जमवून मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

A gang member on Gangapur Road attack | गंगापूररोडवरील व्यावसायिकावर टोळक्याचा हल्ला

गंगापूररोडवरील व्यावसायिकावर टोळक्याचा हल्ला

Next
ठळक मुद्दे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गादी-सोफे तयार करण्याच्या कारणावरून मारहाण सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे

नाशिक : गंगापूररोडवरील एका कुशनच्या दुकानावर मारुती स्विफ्टमधून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हल्ला करत व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील आनंदवल्ली शिवारात असलेल्या एका कुशनच्या दुकानावर टोळक्याने येऊन गोंधळ घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याची फिर्याद व्यावसायिक सद्दाम अब्दुलरहेमान खान यांनी दिली आहे. मारुती स्विफ्टमधून आलेले (एम.एच.०६ ए.डब्ल्यू १५०६) व (एम.एच.०६ ए.डब्ल्यू १५०६) संशयित मोहम्मद मुस्तुफा खान, गणी करम खान, अब्दुल शेख, आजम खान, इकरार, खान, इबरार खान, इस्त्रार खान, अन्वर खान (सर्व रा. खोडेनगर, मिल्लतनगर वडाळा शिवार) यांनी गादी-सोफे तयार करण्याच्या कारणावरून फिर्यादी खान यास मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी खान यांचा चुलत भाऊ भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन मोटारीतून आलेल्या या टोळक्याने गैरकायदानुसार गर्दी जमवून मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A gang member on Gangapur Road attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.