हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन गांधीगीरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:30 PM2019-02-02T18:30:20+5:302019-02-02T18:36:21+5:30

येवला : जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने शहरासह ग्रामीण परिसरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती सुरु करण्यात आली असून पहिल्याच दिवशी अनेकांना दंडही करण्यात आला होता. मात्र तरीही हेल्मेट सक्तीच्या दुसºया दिवशी अनेक दुचारकीस्वार विनाहेल्मेट दुचाकीवरून जात असल्याने येवला शहरातील विंचुर चौफुली येथे बल्लू टि मित्र मंडळाने त्यांना गुलाबपुष्प देत गांधीगीरी मार्गाने हेल्मेटचे महत्व पटवून दिले.

Gandhigiri by giving a bouquet of helmets to the two wheelers | हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन गांधीगीरी

ने येवला शहरातील विंचुर चौफुली येथे बल्लू टि मित्र मंडळाने त्यांना गुलाबपुष्प देत गांधीगीरी मार्गाने हेल्मेटचे महत्व पटवून दिले.

Next
ठळक मुद्देगुलाबपुष्प देऊन येथून पुढे दुचाकीवर हेल्मेटच घालणार अशी शपथ दिली.

येवला : जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने शहरासह ग्रामीण परिसरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती सुरु करण्यात आली असून पहिल्याच दिवशी अनेकांना दंडही करण्यात आला होता. मात्र तरीही हेल्मेट सक्तीच्या दुसºया दिवशी अनेक दुचारकीस्वार विनाहेल्मेट दुचाकीवरून जात असल्याने येवला शहरातील विंचुर चौफुली येथे बल्लू टि मित्र मंडळाने त्यांना गुलाबपुष्प देत गांधीगीरी मार्गाने हेल्मेटचे महत्व पटवून दिले.
येवला शहरातील विंचुर चौफुलीवर सकाळी साडेदहाच्या सुमारास तेथील बल्लू टि मित्र मंडळाच्या धिरजिसंग परदेशी, बापू जाधव, नानासाहेब शिंदे, किरणसिंग परदेशी, यशवंत रहाणे, गणेश लोणारी, संदिप दारु ंटे, पप्पु दारुंटे, सुशांत हजारे, नवनाथ लभडे यांनी दुचाकीवरून बिगर हेल्मेट जाणाºया स्वारांना हेल्मेट सक्ती का व हेल्मेटची गरज कशी तुमच्या हिताची आहे हे समजून सांगत गुलाबपुष्प देऊन येथून पुढे दुचाकीवर हेल्मेटच घालणार अशी शपथ दिली.
दुचाकी वाहनचालकांना थांबवुन त्यांना हेल्मेट नसल्यामुळे अपघातात अनेकांचा मृत्यू कसा झाला, याचीही माहिती देत कुटुंबिंयाकडे पहा व हेल्मेट वापरा असा सल्ला धिरज परदेशी यांनी दिला. तर ज्यांनी हेल्मेट सक्तीचे महत्व लक्षात घेऊन हेल्मेट धारण केले होते अशा दुचाकीस्वारांनाही गुलाबपुष्प देऊन हेल्मेटसक्ती चे पालन केल्याने त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते.

Web Title: Gandhigiri by giving a bouquet of helmets to the two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.