गल्लोगल्ली रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 06:37 PM2019-03-26T18:37:00+5:302019-03-26T18:37:17+5:30

ओझर : येथे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. व्यापारपेठेत सकाळी बारा वाजेपर्यंत व्यवहार सुरू होते. त्यानंतर जल्लोष वाढायला लागला.चिमुकल्यांनी सकाळपासून गल्लोगल्ली रंग खेळण्यास सुरुवात केली होती.

 Gallagini color | गल्लोगल्ली रंग

गल्लोगल्ली रंग

Next
ठळक मुद्देदुपारनंतर खऱ्यार्थाने रंगोत्सव सुरू झाला. मेनरोड मित्रमंडळाने कमी प्रमाणात पाण्याचा उपयोग होण्यासाठी अनोख्या पद्धतीने शॉवरची बांधणी केली होती.


ओझर : येथे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. व्यापारपेठेत सकाळी बारा वाजेपर्यंत व्यवहार सुरू होते. त्यानंतर जल्लोष वाढायला लागला.चिमुकल्यांनी सकाळपासून गल्लोगल्ली रंग खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर संभाजी चौक मित्रमंडळ, बाजारपेठ मित्रमंडळ, तांबट लेन भगवा चौक, नानासाहेब अक्कर चौक, हनुमान चौक, वीर तानाजी चौक, राणाप्रताप चौक, माहेश्वरी समाज मंडळ, माहेश्वरी प्रगती महिला मंडळ, कासार समाज मंडळ यांच्यासह उपनगरातदेखील तरु णाईने ढोलताशावर ठेका धरत रंगाची उधळण कतरना दिसत होती. तरु णांसह महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणात रंग खेळला. सरकारी कार्यालये सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी कोरडा रंग खेळण्याला पसंती दिली. गावात सायंकाळी सहा वाजेपर्यंत रंगोत्सवाचा ज्वर होता. सहा वाजेनंतर दुकाने सुरू झाली.
 

Web Title:  Gallagini color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.