पोफळेनगरात गजानन महाराज प्रगट दिन

मालेगाव : येथील पोफळेनगर भागातील संतश्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. गजानन महाराजांची महापूजा विजय पोफळे, जयश्री पोफळे, महेश पोफळे, माधवी पोफळे यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या सोमवार ते बुधवार दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात सोमवारी सकाळी आठ वाजता आरती व उपासना, साडेआठ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी सात वाजता महाआरती व रात्री साडेआठ वाजता हभप ज्ञानेश्वर गोरे यांचे कीर्तन झाले. तर मंगळवारी आरती, उपासना, पारायण, भजन, नरेंद्र महाराज गुरव यांचे कीर्तन, बुधवारी धार्मिक विधी उपासना, पालखी सोहळा, मच्छिंद्र महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नितीन पोफळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.