...तर भावीपिढी वनौषधी ओळखणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:31 AM2018-07-18T01:31:51+5:302018-07-18T01:32:12+5:30

नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी पिढीला वनौषधीची कुठलीही ओळख नसेल, अशी खंत सेवानिवृत्त वनधिकारी व वनौषधीच्या अभ्यासक कुसुम दहीवेलकर यांनी व्यक्त केली.

... but the future will not know the herb | ...तर भावीपिढी वनौषधी ओळखणार नाही

...तर भावीपिढी वनौषधी ओळखणार नाही

Next
ठळक मुद्देदहीवेलकर : रोटरीच्या कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी पिढीला वनौषधीची कुठलीही ओळख नसेल, अशी खंत सेवानिवृत्त वनधिकारी व वनौषधीच्या अभ्यासक कुसुम दहीवेलकर यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लबच्या वतीने गंजमाळ येथील सभागृहात मंगळवारी (दि.१७) दहीवेलकर यांची व्याख्यानपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘वनौषधी-आरोग्य अन् वृक्षलागवड’ या विषयावर बोलताना दहीवेलकर यांनी विविध भारतीय प्रजाती व त्यांची योग्य ठिकाणी लागवड आणि आयुर्वेदात त्यांचा औषधी उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. दृकश्राव्य यंत्राच्या सहाय्याने त्यांनी विविध जीवनावश्यक औषधी वनस्पती व त्यांचे औषधी गुणधर्मांची ओळख उपस्थिताना करून दिली. निरगुडी, कडुनिंबाच्या पानांची वाफ बाळांतीण महिलेच्या खोलीत ठेवल्यास तिचे आरोग्य व आजूबाजूचा परिसर निर्जंतुक राहण्यास मदत होते. तसेच समुद्रसोष व पारिजातक या वनस्पतीच्या पानांचा उपचार सांधेदुखीवर रामबाण उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. मानवाची पचनसंस्था उत्तम राहिल्यास आरोग्याच्या तक्रारीही उद्भवत नाही. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यासाठी आवळा-बेहडा-हिरडा या झाडांच्या फळांपासून तयार करण्यात आलेल्या त्रिफळा चूर्ण पचनसंस्थेच्या तक्रारी दूर करण्यास सहायक ठरते.
हिरड्याचे संस्कृतमधील नाव हरितकी असून, त्याचा अर्थ आई असा होतो. या शब्दावरून हिरडा मानवी आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे, याचा सहज अंदाज बांधता येईल, असे दहीवेलकर यावेळी म्हणाल्या. हिरड्याचे कोवळे फळ बाळहिरडा, तर परिपक्व झालेल्या फळाला सुरवाई हिरडा असे म्हटले जाते. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले यांनी केले व आभार मुग्धा लेले यांनी मानले.

Web Title: ... but the future will not know the herb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.