निमतळा आदिवासी वस्तीत मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:55 PM2019-06-04T15:55:48+5:302019-06-04T15:55:53+5:30

साकोरा (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील सामाजिक संस्था श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने साकोरा भागातील निमतळा भागात आदिवासी वस्तीत ज्ञात- अज्ञात व्यक्तीच्या वाढिदवसाचे औचित्य साधून पाणी वाटप केले जात आहे.

 Free water supply to Nettala tribal people | निमतळा आदिवासी वस्तीत मोफत पाणीपुरवठा

निमतळा आदिवासी वस्तीत मोफत पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्दे नांदगाव तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जात असला तरी यंदा जेवढी पाणीटंचाई निर्माण झाली, तशी भयावह पाणीटंचाई यापूर्वी निर्माण झाल्याचे नागरिक ऐकीवात नव्हते.


साकोरा (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील सामाजिक संस्था श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने साकोरा भागातील निमतळा भागात आदिवासी वस्तीत ज्ञात- अज्ञात व्यक्तीच्या वाढिदवसाचे औचित्य साधून पाणी वाटप केले जात आहे.यात साकोरेकरांची तहान गेल्या सहा महिन्यांपासून टँकरवर भागवली जात असून आदिवासी वाड्यावस्त्यांवर नियोजन कोलमडले असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्या अनुशंगाने काही खासगी संस्था पाणीवाटपासाठी पुढे सरसावल्या आहेत. १५दिवसांनी सुध्दा पाणी पुरवठा होत नसल्याने संस्थेच्यावतीने माहिती जमा करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी साकोरा परीसरातील प्रतिनिधी शी बोलुन मोफत पाणी वाटप करायचे ठरविले. पाणी वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष विजय धामणे. संचालक सचिन पवार. सचिव सुरेश देव. मेजर जगन्नाथ सांळुके, मराठा सेवा संघाचे महेंद्र जाधव शिवसंसकार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमीत गुप्ता गणेश बोरसे, बाबासाहेब बोरसे प्रवचनकार नितिन शर्मा हे उपस्थित होते. (04 साकोरा निमतळा)

Web Title:  Free water supply to Nettala tribal people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.