मालेगाव- मनमाड रस्त्यावर अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 02:18 PM2019-02-25T14:18:55+5:302019-02-25T14:19:13+5:30

मालेगाव : अलाहाबाद येथे विवाह समारंभ आटोपून कारने पुण्याकडे परतताना मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून त्यात दोन महिला व एका मुलगा-मुलीचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले.

Four killed in Malegaon-Manmad road crash | मालेगाव- मनमाड रस्त्यावर अपघातात चार ठार

मालेगाव- मनमाड रस्त्यावर अपघातात चार ठार

googlenewsNext

मालेगाव : अलाहाबाद येथे विवाह समारंभ आटोपून कारने पुण्याकडे परतताना मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून त्यात दोन महिला व एका मुलगा-मुलीचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले. जखमींवर मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे येथील मृत्युंजय सिंग व त्यांचे कुटुंबिय अलाहाबाद येथे विवाह समारंभासाठी गेले होते. त्यांच्या समवेत नांदेड येथील त्यांचा साडू व त्यांचा परिवार होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास मालेगाव-मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकवर इीर्टिका कार आदळून अपघात झाला. यात विजीतसिंग शहा (३५) रा. नांदेड, मृत्युंजय सिंग (३०) व रित सिंग (५) व एक अडीच वर्षांची मुलगी जखमी झाले आहेत. तर शालीनी सिंग, अंजु सिंग व रिद्धी सिंग यांचा मृतात समावेश आहे. तालुका पोलीसात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक हिरे करीत आहेत.

Web Title: Four killed in Malegaon-Manmad road crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक