वटारला बिबट्याकडून चार शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:23 PM2019-07-15T15:23:06+5:302019-07-15T15:23:12+5:30

वटार : वटार येथील सावतावाडी परिसारातील बिबट्याने रामदास शिंदे यांच्या बकरीच्या वाड्यावर पहाटे हल्ला चडवित चार शेळ्या फस्त करत काही शेळ्या जखमी केल्याने पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले आहेत.

 Four goats are fattened from the leopard | वटारला बिबट्याकडून चार शेळ्या फस्त

वटारला बिबट्याकडून चार शेळ्या फस्त

Next
ठळक मुद्दे मुक्तसंचार: ग्रामस्थभयभीत, पशुधन धोक्यात



वटार : वटार येथील सावतावाडी परिसारातील बिबट्याने रामदास शिंदे यांच्या बकरीच्या वाड्यावर पहाटे हल्ला चडवित चार शेळ्या फस्त करत काही शेळ्या जखमी केल्याने पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले आहेत.यामुळेपशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याच्या वावर असतो. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. पण अचानक बिबट्याच्या वावर असल्याने पशुधन धोक्यातआले आहे.
येथील सावंतावाडी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसांपासून वावर असून दोन तीन शेतकऱ्यांना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षि पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपण्यासाठी मोठी काटेरी जुडपे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या जनावरांवरहल्लेकरीतआहे.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी १०ते १५ मेँढयाबिबट्याला बळी द्याव्या लागत आहेत. गेल्या एक वर्षात ३० शेळ्यामेँढयाना आपला बळी द्यावा लागला आहे.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काडावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.

Web Title:  Four goats are fattened from the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.