शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:35 AM2018-11-13T00:35:56+5:302018-11-13T00:36:17+5:30

शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

 Four die in different situations in the city | शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

Next

नाशिक : शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  गंगापूर रोडवरील सोमेश्वर गेटसमोरील १९ वर्षीय युवकाने घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास घडली़ सुरेश बुधा धनगर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
इंदिरानगरच्या गामणे मळा परिसरातील १८ वर्षीय युवतीने घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास घडली़ रुपाली रामधवन वर्मा (रा़ शांतीदर्शन अपार्टमेंट) असे आत्महत्या करणाºया युवतीचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी औरंगाबाद महामार्गावर घडली़ मुकेश यादव (रा़ नानावली, द्वारका, मूळ रा़ विजयपूर, मध्य प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत यादव यास औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल ते सिद्धिविनायक लॉन्सदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिली होती़ यामध्ये त्याच्या चेहºयास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
टायफाईडच्या आजाराने २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१०) मध्यरात्रीच्या सुमारास चुंचाळे शिवारात घडली़ सगुणा भगवान जाधव (घरकुल योजना, चुंचाळे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
राणेनगर येथील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
राणेनगर परिसरातील नागरिक पेट्रोल चोर, टवाळखोर तसेच भुरटे चोरांमुळे त्रस्त झाले असून चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या सिडको विभागाचे कार्याध्यक्ष विक्र ांत डहाळे यांनी केली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना नुकतेच या आशयाचे निवेदन देण्यात आले.
४या परिसरात पेट्रोल तसेच इतर प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कार्याध्यक्ष विक्रांत डहाळे यांनी केली आहे. यावेळी चिन्मय गाढे, विशाल डोखे, सुनील घुगे, सुरजित सिंग, स्वप्नील चुंभळे, सागर देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title:  Four die in different situations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.