मेगा ब्लॉकमुळे आज पाच रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:33 AM2019-02-10T01:33:52+5:302019-02-10T01:34:52+5:30

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विभागामध्ये रविवारी (१० फेब्रुवारी) कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने मुंबईला जाणाऱ्या व येणाºया पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Five trains canceled due to mega block | मेगा ब्लॉकमुळे आज पाच रेल्वे रद्द

मेगा ब्लॉकमुळे आज पाच रेल्वे रद्द

Next

नाशिकरोड : मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विभागामध्ये रविवारी (१० फेब्रुवारी) कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने मुंबईला जाणाऱ्या व येणाºया पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या मध्य रेल्वे विभागात विविध कामांसाठी रविवारी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने मनमाड-मुंबई जाणारी-येणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस व भुसावळ-नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, तर नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिरोड रेल्वेस्थानकापर्यंतच धावणार असून पुन्हा तिच्या निर्धारित वेळेला नाशिकरोडहून नागपूरला जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Web Title: Five trains canceled due to mega block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.