आरटीईच्या पहिल्या सोडतीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:44 PM2018-03-14T13:44:40+5:302018-03-14T13:44:40+5:30

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत  जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिलीच्या 2 हजार 917 विद्यार्थ्यांसह पूर्व प्राथमिकच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. पहिल्या फेरीत zशाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्याथ्र्याना पहिल्या सोडतीत प्राधान्य मिळाले आहे.

In the first draw of RTE, three thousand students in the draw | आरटीईच्या पहिल्या सोडतीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

आरटीईच्या पहिल्या सोडतीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यासाठी आरटीईची पहिली सोडत जाहीरपहिल्या फेरीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी पहिलीच्या 2917 व नर्सरीच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत  जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिलीच्या 2 हजार 917 विद्यार्थ्यांसह पूर्व प्राथमिकच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. पहिल्या फेरीत zशाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्याथ्र्याना पहिल्या सोडतीत प्राधान्य मिळाले आहे. त्याहून अधिक अंतर असलेल्या विद्याथ्र्याना पुढील सोडतीत संधी मिळणार आहे.  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्याथ्र्यासाठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यासाठी मंगळवारी (दि. 13) शासकीय कन्या शाळेत पहिली सोडत काढण्यात आली. चार विद्याथ्र्याच्या हस्ते 0 ते 9 क्रमांकाच्या चिठ्ठय़ा काढून संबंधित अंक संगणकीय यंत्रणोवर टाकून ऑनलाइन पद्धतीने ही लॉटरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतिन पगार, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, उपशिक्षणधिकारी राजीव म्हसकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. शिक्षण हक्क  कायद्यांतर्गत जिल्ह्यातील 466 शाळांमधील 6 हजार 589 जागांसाठी सुमारे दहा हजार 416 प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, यातील 3001 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर उर्वरित विद्याथ्र्यासाठी पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आरटीई कायद्यामुळे संधी मिळत असल्याने जिल्हाभरातून सुमारे 1क् हजार 416 विद्याथ्र्याच्या पालकांनी या प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी सोडत पद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्याच्या पालकांना त्यासंबंधीची माहितीही मोबाइल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर सर्व अर्ज करणाऱ्या विद्याथ्र्याच्या अर्जाची स्थितीही दिसणार आहे.  

पहिल्या सोडतीत बागलाण तालुक्यातील 102 अर्जाची निवड झाली असून, चांदवड 53, देवळा 61, दिंडोरी 58, इगतपुरी 97, कळवण 49, मालेगाव 13क्, नांदगाव 65, नाशिक 1क्5, निफाड 296, पेठ 8, सिन्नर 155, सुरगाणा 5, त्र्यंबकेश्वर 34, येवला नाशिक यूआरसी 1-665, मालेगाव कॅम्प 134 व नाशिक यूआरसी 2 मध्ये 896 विद्याथ्र्याच्या अर्जाची निवड झाली आहे. 28 ते 31 मार्चदरम्यान दुसरी सोडत  पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालक 14 ते 24 मार्च या कालावधीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. या फेरीत संधी मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांसाठी दि. 28 ते 31 मार्च या कालावधीत दुसरी सोडत काढण्यात येणार असून, या फेरीत संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. 2 ते 12 एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

Web Title: In the first draw of RTE, three thousand students in the draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.