विश्रामगडावरील भाविकांसाठी प्रथमोपचार पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:06 PM2019-05-19T19:06:10+5:302019-05-19T19:06:42+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विश्रामगडावरील चौकशी कक्षातील वनविभागातील कर्मचारी वर्गाकडे प्रथमोपचार औषध साहित्य व गडावरील माकडांसाठी खाद्य पदार्थ देऊन ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने रामदास भोर, सागर भोर, रमेश खोलमकर, रोहित वालझाडे, नीलेश गुंड, राहुल काकड, ज्ञानेश्वर भोर, अमित रविशंकर आदींनी एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.

First aid box for the devotees at the station | विश्रामगडावरील भाविकांसाठी प्रथमोपचार पेटी

नाशिक व नगर जिल्ह्यातील हद्दीवर असणाऱ्या विश्रामगडावर ठाणगाव येथील जनसेवा मंडळाच्या सदस्यांनी गडावर येणाºया शिवभक्तांसाठी औषधोपचार पेटी देताना रामदास भोर, रमेश खोलमकर, अण्णा डगळे, निवृत्ती जाधव, कुडंलिक गोडे, बहिरू गोडे, अमित रविशंकर, ईश्वर गोडे, योगेश गाडे आदी

Next

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विश्रामगडावरील चौकशी कक्षातील वनविभागातील कर्मचारी वर्गाकडे प्रथमोपचार औषध साहित्य व गडावरील माकडांसाठी खाद्य पदार्थ देऊन ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने रामदास भोर, सागर भोर, रमेश खोलमकर, रोहित वालझाडे, नीलेश गुंड, राहुल काकड, ज्ञानेश्वर भोर, अमित रविशंकर आदींनी एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.
उन्हाळ्यात विश्रामगड पाहण्यासाठी येणाºया शिवभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गडावर लहान मुलांबरोबरच आबालवृद्धांची वर्दळ वाढत आहे. गडावर काही अनुचित प्रकार घडल्यास प्राथमिक स्वरूपातील डेटॉल, बॅण्डेज पट्टी, ग्लिसरिन आदी प्राथमिक स्वरूपातील औषधांची सुविधा देण्यात आली
आहे.
विश्रामगडावरील पायथ्याशी असणाºया वनविभागाच्या चौकशी कक्षात असणारे वनकर्मचारी हौशीराम गोडे, निवृत्ती जाधव, कुंडलिक गोडे, बहिरू गोडे यांच्याकडे औषध साहित्य सुपूर्द करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात गडावर माकडांना पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र त्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ नसल्याने माकडांचे होणारे हाल पाहून ठाणगाव येथील जनसेवा मित्र मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत गडावर जात माकडाना खाद्यपदार्थ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गडावर येणाºया शिवभक्तांनी आपल्या घरातून जे खाद्यपदार्थ असतील ते घेऊन गडावर यावे व गडाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी केले आहे.

Web Title: First aid box for the devotees at the station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.