डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग नुकसान : अडीच ते तीन हेक्टर क्षेत्र खाक झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:58 PM2018-05-08T23:58:00+5:302018-05-08T23:58:00+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगराला लागलेल्या आगीत झाडेझुडपे जळून खाक झाले. सुमारे अडीच ते तीन हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

Fire damage to Dongraon forest: One in three hectare areas | डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग नुकसान : अडीच ते तीन हेक्टर क्षेत्र खाक झाल्याचा अंदाज

डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग नुकसान : अडीच ते तीन हेक्टर क्षेत्र खाक झाल्याचा अंदाज

Next

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगराला लागलेल्या आगीत झाडेझुडपे जळून खाक झाले. सुमारे अडीच ते तीन हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. येथील महादू गोपाळा पानसरे यांच्या शेताजवळील डोंगराला दुपारी आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी सरपंच दयाराम सावंत यांना दूरध्वनीद्वारे कळविले. लगेचच सरपंच दयाराम सावंत आणि उपसरपंच लालजी सावंत यांनी नागरिकांना कळविले. नागरिकांनी त्वरित आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वनविभागाचे कर्मचारी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. वनविभागाचे लोखंडे, गायकवाड, सोनवणे आणि सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच लालजी सावंत आणि नागरिकांनी आग आटोक्यात आणली.

Web Title: Fire damage to Dongraon forest: One in three hectare areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग