न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

By admin | Published: December 21, 2014 12:23 AM2014-12-21T00:23:58+5:302014-12-21T00:24:14+5:30

न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

Fire brigade fire in Kobhul Peth in Nivivar Peth: Detecting the cause of fire | न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

Next

 शिक : रविवार पेठच्या गाडगीळ गल्लीतील सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या दोन मजली कोठुळे वाड्याला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सव्वातास शर्थीचे प्रयत्न करून सहा बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली़ दरम्यान, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात असून, शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जाते आहे़
रविवार पेठेतील गाडगीळ गल्लीत बाळकृष्ण यशवंत कोठुळे यांचा सुमारे साठ वर्षांपूर्वीचा दोन मजली जुना लाकडी वाडा आहे़ या वाड्यामध्ये लाकडाचा सर्वाधिक वापर असून, दुसऱ्या मजल्यावरील छतावर लोखंडी पत्रे टाकलेले होते़ शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या वाड्याला आग लागल्याचे समजताच त्यांची सून व नात या तत्काळ घराबाहेर पडल्याने बचावल्या़ यानंतर आग धुमसत गेली़ अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर या गाड्या त्वरित घटनास्थळी
रवाना झाल्या मात्र त्यांना पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़
रविवार पेठ रस्त्याचे काम सुरू असल्याने अग्निशमन दलाचे बंब हे रामवाडी पुलाच्या बाजूने आगीच्या ठिकाणापर्यंत न्यावे लागले़ दोन वाजेच्या सुमारास लागलेली ही आग सव्वातीन वाजेच्या सुमारास विझविण्यात यश आले़ त्यासाठी सुमारे सव्वातासाचा कालावधी लागला़ अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अनिल महाजन, विकास गवळी, राजेंद्र बैरागी, पी़ व्ही़ तिडके, जे़ एस़ अहेर, सी़ एल़ भोळे, श्याम राऊत, डी़ बी़ गायकवाड यांच्यासह सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचे काम केले़
तसेच अग्निशमन दलाच्या खांद्याला खांदा लावून गाडगीळ गल्लीतील तरुणांनी आग विझविण्यास मदत केली़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक यतिन वाघ, सुरेखा भोसले आदिंनी या ठिकाणी भेट दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Fire brigade fire in Kobhul Peth in Nivivar Peth: Detecting the cause of fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.