हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

By admin | Published: August 30, 2015 10:06 PM2015-08-30T22:06:11+5:302015-08-30T22:10:18+5:30

हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

Financial losses of hotel professionals | हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

Next

वणी : कुंभमेळा पर्वणीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या दृष्टिकोनातून हॉटेल चालकांनी व्यवसायाचे नियोजन आखले होते. मात्र पर्वणीला भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने या हॉटेलचालकांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नानासाठी गुजरातमधील भाविक मोठया प्रमाणावर हजेरी लावतील व पर्वणीनंतर याच मार्गाने परतताना वणी आणि परिसरातील देवस्थानांचेही दर्शन घेतील,असे अंदाज बांधून अनेकांनी व्यावसायिक पर्वणी साधण्याचे ठरविले होते. त्या हेतुने वणी-सापुतारा, वणी- कळवण, वणी-पिंपळगाव रस्त्यालगतच अनेकांनी हॉटेल व्यवसाय सुरू केले. काहींनी उधारऊसने पैसे घेऊन तर काहींनी कर्ज काढून व्यवसायात गुंतवणुक केली होती. हॉटेलचे नूतनीकरण तसेच खाजगी वाहनांसाठी हॉटेलसमोर वाहनतळाची सोय केली होती. तसेच शीतपेये, खाद्यपदार्थ याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला होता.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती याचा परिणाम भाविकांच्या पर्वणीतील उपस्थितीवर झाला. परिणामी या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाली. (वार्ताहर)
गुरूदत्त पतसंस्थेची सभा
वणी : गुरुदत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
५० लाख भागभांडवल आहे. ६ कोटी ८५ लाख १५ हजारांच्या ठेवी असुन ३ कोटी ३३ लाख ९१ हजार गुंतवणुक आहे. चालू वर्षात २२ लाख ३३ हजाराचा नफा झाला असून सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप तसेच दोन हजार रु पयाची ठेव पावती देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भास्कर फुगट यांनी दिली. यावेळी संजय उंबरे, रवी सोणवणे, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत कुवर, विजय निरगुडे, मारु ती पवार, संजय शेळके, संदिप पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Financial losses of hotel professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.