सभासदांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM2018-03-24T00:10:28+5:302018-03-24T00:10:28+5:30

सप्तश्रृंगी सहकारी सुतिगरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली असून सदर सुतगिरणीच्या सभासदांनी धारण केलेल्या भागाची रक्कम त्यांना परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असल्याची माहीती संजय गीते, अवसायक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा यांनी दिली आहे

 Fill up the way for members to get money | सभासदांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

सभासदांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

googlenewsNext

देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतिगरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली असून सदर सुतगिरणीच्या सभासदांनी धारण केलेल्या भागाची रक्कम त्यांना परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असल्याची माहीती संजय गीते, अवसायक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा यांनी दिली आहे. १९९७ साली नियोजित सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेचे सभासदत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी संस्थेचे शेअर्स पोटी रक्कम जमा केली व ते संस्थेचे सभासद झाले होते. ही सुतगिरणी अस्तित्वात आली नाही. कालांतराने सुतिगरणीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येउन त्यावर प्रशासक नेमण्यात आले. नंतर ही संस्था अवसायानात निघाली. देवळयाचे सहाय्यक निबंधक संजय गीते यांची अवसायक म्हणून सुतिगरणीवर नेमणुक झाली. वाजगाव येथील ह्या सुतगिरणीचे सभासद स्व. दिनकर आनंदा देवरे यांचे वारसदार संजय देवरे यांनी आपल्या वडिलांनी शेअर्स पोटी भरणा केलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली. अवसायानात निघालेल्या सुतिगरणीची नोंदणी रद्द करण्याचे आदेश संचालक, वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन नागपूर यांनी दिल्यानंतर सभासदांचे शेअर्सची रक्कम परत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला. त्याप्रमाणे सभासदांनी दिलेल्या मुदतीत विहीत नमुन्यातील अर्जासोबत शेअर्स पावती, आधार कार्ड व रेशनकार्डची छायांकित प्रत, तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत. सभासद मयत असल्यास न्यायालयाचा किंवा तहसिलदारांचा वारस दाखला जोडणे आवश्यक आहे. सुतगिरणीच्या जास्तीत जास्त सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गीते यांनी केले आहे.

Web Title:  Fill up the way for members to get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक