बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:47 AM2018-01-23T00:47:12+5:302018-01-23T00:47:33+5:30

कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व आनंद दवे यांना अटक करावी व मानव अधिकारांचे उल्लंघन करणाºया राज्य सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

 Fierce demonstrations on behalf of Bahujan Kranti Morcha | बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शने

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शने

Next

नाशिक : कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व आनंद दवे यांना अटक करावी व मानव अधिकारांचे उल्लंघन करणाºया राज्य सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.  निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडविणाºया आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच या  दंगलीस कारणीभूत असलेल्या एकबोटे, भिडे व दवे यांना त्वरित अटक करावी, कोम्बिंग आॅपरेशनद्वारे अमानवी पद्धतीने आणि असंवेधानिक पद्धतीने लोकांना अटक करणे, निरापराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे या गोष्टी त्वरित बंद करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.  सदर आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्टÑीय मूळनिवासी महिला संघ, भारतीय विद्यार्थी, युवा व बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, इंडियन लॉयर असोसिएशन, राष्टÑीय मुस्लीम मोर्चा, अत्याचार विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात अ‍ॅड. सुजाता चौदंते, तृषाल अंभोरे, सिद्धार्थ ढेंगळे, विराज दाणी, शिवराज जाचक, सागर साळवे, तेंजस ढेंगळे, सागर पवार, गौतम जाधव, राहुल तूपलोंढे, दीपक गांगुर्डे, आकाश वाघमारे, प्रतीक्षा चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title:  Fierce demonstrations on behalf of Bahujan Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक