खतप्रकल्पाची दुर्गंधी वाढलीं

By Admin | Published: July 19, 2016 01:32 AM2016-07-19T01:32:14+5:302016-07-19T01:39:28+5:30

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रकल्पाची लागली वाट, उपाययोजनेकडे डोळेझाक

Fertilization of fertilizer increased | खतप्रकल्पाची दुर्गंधी वाढलीं

खतप्रकल्पाची दुर्गंधी वाढलीं

googlenewsNext

 सिडको : पांडवलेणीनजीक असलेल्या महापालिकेच्या खतप्रकल्पाची दुर्गंधी परिसरात पसरत असून, पावसामुळे यात अधिक भर पडत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खतप्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू नसून प्रकल्पाची पूर्णपणे वाट लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महापालिकेच्या वतीने याठिकाणी खातप्रकल्प सुरू करताना याचा कोणालाही त्रास होणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतु खतप्रकल्प सुरू झाल्यानंतर मात्र मनपाला याचा विसर पडला. या खतप्रकल्पाची दुर्गंधी परिसरातील गावांबरोबरच पाथर्डी फाटा, अश्विननगर या भागापर्यंत पोहचली असल्याने नागरिकांनी मनपाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच खतप्रकल्पाच्या ढिगाऱ्याखाली कचरा गोळा करीत असताना दुपारच्या सुमारास एका महिलेसह चिमुकली गाडली गेली होती. याच खतप्रकल्पामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात राहणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या महिलांसह काही नागरिक आतमध्ये कायमच शिरकाव करतात. परंतु यानंतरही मनपा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत मनपास कळत नसल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
या खतप्रकल्पात पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू नसल्याचे अनेकदा उघडकीस झाले आहे. तसेच याआधीही याठिकाणी आग लावण्यात आली होती. परंतु दुर्घटना घडल्यानंतरही मनपाकडून याकडे गांर्भीयाने बघितले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात
आहे.
याठिकाणी असलेल्या लाखो रुपयांच्या मशिनरी धूळखात पडून असून, खतप्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे समजते. येथे असलेली सुरक्षाव्यवस्था कमकुवत असून मनपाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fertilization of fertilizer increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.