निफाडच्या पूर्व भागातील रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:55 AM2018-08-07T01:55:27+5:302018-08-07T01:55:50+5:30

निफाडच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.६) मरळगोई चौफुलीवर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

 Fasting for the repair of roads in the eastern part of Niphad | निफाडच्या पूर्व भागातील रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण

निफाडच्या पूर्व भागातील रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण

Next

लासलगाव/देवगाव : निफाडच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.६) मरळगोई चौफुलीवर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
भरवस - लासलगाव, मरळगोई-विंचुर, गोंदेगाव-वाहेगाव या रस्त्यांची अत्यंंत दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. तसे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागालाही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी-शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लासलगाव-भरवस रस्त्याचे अर्धवट बांधकाम वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. तसेच रस्त्यांवरील काटेरी झुडपे अपघातास निमंत्रण ठरत आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, संभाजी पवार, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या रस्त्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ललित दरेकर,सामाजिक कार्यकर्ते अशोकबाबा आहेर,पंचायत समिती सभापती राजेश पाटील, उपसभापती गुरु देव कांदे, सदस्य पंडित आहेर, शिव सुराशे, शहाजी राजोळे, सोमनाथ गांगुर्डे, शंकर संगमनेरे, चारोस्कर, भाऊ घुमरे, वाहेगाव सोसायटी उपसभापती प्रदीप तिपायले, पंचायत समितीचे माजी सदस्य राजाभाऊ दरेकर,प्रकाश पाटील, वाहेगाव ग्रामपंचायत उपसरपंच दशरथ आहेर, गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच शांताराम कांगणे, उपसरपंच विक्र म भोसले, मरळगोई सरपंच रामदास जगताप, शिवसेना ग्राहक संरक्षण समिती तालुकाप्रमुख योगेश काळे आदी उपस्थित होते.

Web Title:  Fasting for the repair of roads in the eastern part of Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.