शेतकऱ्यांचा सहभाग : वासोळ येथे वांजुळपाणी संघर्ष समितीची बैठक पाण्यासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:15 AM2018-04-27T00:15:10+5:302018-04-27T00:15:10+5:30

लोहोणेर : वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या संघर्ष यात्रेची जनजागृती बैठक वासोळ ( ता. देवळा) येथे झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Farmers Participation: Public awareness for meeting meeting of Wanjulpani Sangh committee at Wassol | शेतकऱ्यांचा सहभाग : वासोळ येथे वांजुळपाणी संघर्ष समितीची बैठक पाण्यासाठी जनजागृती

शेतकऱ्यांचा सहभाग : वासोळ येथे वांजुळपाणी संघर्ष समितीची बैठक पाण्यासाठी जनजागृती

googlenewsNext

लोहोणेर : वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या संघर्ष यात्रेची जनजागृती बैठक वासोळ ( ता. देवळा) येथे झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांनी सांगितले की, शेतकरी संघटनेच्या आंदोलनात पुढाºयांना गावबंदी केली गेली होती, त्यावेळी देवळा येथे तत्कालीन मंत्री शिवाजीराव निलंगेकर यांची सभादेखील कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती, पाणी हाच पक्ष मानून प्रत्येक शेतकºयाच्या सर्व कुटुंबाने आंदोलनात सहभागी होऊन पोलीस आता गोळीबार करू शकत नाहीत त्यामुळे लाठ्या काठ्या खायला तयार राहावे त्याशिवाय आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळणार नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर येणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करावी लागेल. त्यासाठी युवकांनी तयार राहावे. प्रा. के. एन. आहिरे यांनी नार-पार गिरणा लिंक प्रकल्पाला आमचा विरोध नाही हा प्रकल्प झालाच पाहिजे पण त्यात प्रवाही वळण योजनेचा समावेश करून जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अहवाला- नुसार ५० टीएमसी पाणी गिरणा नदीत टाकावे अशी मागणी केली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे, अनिल निकम, शेखर पवार, पंचायत समिती सदस्य पंकज निकम, शेखर पगार यांनी मनोगत व्यक्त केले. कुंदन चव्हाण यांनी प्रास्ताविकात समितीची भूमिका मांडली. यावेळी निखिल पवार, देवा पाटील, विवेक वारूळे, मनीष सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, दगडू काका भामरे, संदीप देवरे, भाऊसाहेब पगार, स्वप्निल सूर्यवंशी, योगेश महाले, संदीप भामरे, स्वप्निल आहिरे, कैलास भामरे, दत्तू पगार, राहुल पगार, सुनील पाटील यासह वासोळ ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात बैठकीस हजर होते.

Web Title: Farmers Participation: Public awareness for meeting meeting of Wanjulpani Sangh committee at Wassol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी