किसान सभेचा दिंडोरी तहसीलवर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:43 PM2018-12-06T14:43:39+5:302018-12-06T14:44:16+5:30

दिंडोरी : दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

The farmers' meeting was held at Dindori Tehsil | किसान सभेचा दिंडोरी तहसीलवर ठिय्या

किसान सभेचा दिंडोरी तहसीलवर ठिय्या

Next

दिंडोरी : दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आदोलनामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सेक्र ेटरी रमेश मालुसरे यांनी केले. सन २०१६ साली नाशिक येथे महामुक्काम मोर्चापासून ६ ते १२ मार्च २०१८ च्या मुंबई लॉगमार्चच्या काळात अनेक आंदोलन करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या, परंतु मागण्यांची पुर्तता मात्र अद्याप केलेली नाही. मागण्यांची अंमलबजावणी केलेली नाही. यंदा तर भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी मार्चेकरांनी केली. दिंडोरी बाजार समिती आवारापासून तहसील कार्यालयापर्यंंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान विविध मागण्यांच्या घोषणा देवून सरकारचा निषेध केला. यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत रमेश चौधरी, देवीदास वाघ, आप्पा वटाणे, सुनील मालसुरे, देवीदास गायकवाड यांंनी सरकाराचा निषेध केला. मोर्चेकºयांच्या गर्दीमुळे दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी रमेश चोधरी, देवीदास वाघ, रमेश चतुर, समाधान सोमासे, वसंत गांगोडे, आप्पा वटाणे, परशराम गांगुडेर्र्, दौलत भोये, हिरामण गायकवाड, श्रीराम पवार, हिरा जोपळे, लक्ष्मीबाई काळे, संजय भोये, दशरथ गायकवाड, अंबादास सोनवणे, रामचद्र गुंबाडे आदी उपस्थित ंहोते.

 

Web Title: The farmers' meeting was held at Dindori Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक