सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:09 AM2018-08-23T01:09:01+5:302018-08-23T01:09:22+5:30

जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

False cheating of the people by government: Chhagan Bhujbal | सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ

सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ

Next

मनमाड : जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  सटाणा येथे कार्यक्रमासाठी जात असताना मनमाडकरांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. युवक क्रांती कार्यालयासमोर राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे, योगेश पाटील, कैलास पाटील, रूपाली पगारे, सुभाष नहार, रईस फारूकी, हबीब शेख, भारती देशमुख यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.  आपणाला पूर्वीही खूप त्रास झाला व या पुढेही होत राहील तरीही आपण कुठलीही तडजोड न करता फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्ग सोडणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्याच्या सरकारवर भुजबळ यांनी टीकेची झोड उठवली. निवडणुकांपूर्वी दिलेल्या अश्वासनांची पूर्तता न झाल्याने जनतेची फसवणूक झाली. आता तरी जनतेने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यात आपणाला कुणीही वाचवू शकणार नाही. निवडणुका जवळ आल्याने धर्मा-धर्मात वाद निर्माण केले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

Web Title: False cheating of the people by government: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.