जेएटी इंग्रजी विभागातर्फे फेशर्स डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:55 PM2018-08-06T17:55:45+5:302018-08-06T17:56:11+5:30

मालेगाव : येथील जेएटी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे साजरा करण्यात आला. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनींचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात येते.

Facies de by JAT english department | जेएटी इंग्रजी विभागातर्फे फेशर्स डे

जेएटी इंग्रजी विभागातर्फे फेशर्स डे

googlenewsNext

मालेगाव : येथील जेएटी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे साजरा करण्यात आला. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनींचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात येते.
तृतीय वर्ष कला शाखेच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींनी नवोदितांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अन्सारी मोहंमद हारुण होते. इंग्रजी विभागातील विद्यार्थिनी कु. रुबीना अब्दुल सत्तार आणि झरीन नाझ मोहंमद इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रुबीना सत्तार हिचा आणि राष्टÑीय पात्रता चाचणी नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल झरीन नाझ मोहंमद इकबाल हिचा सत्कार करण्यात आला.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय कला शाखेतील इंग्रजी विभागातील विद्यापीठ परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यश प्राप्त विद्यार्थिनी पुढील प्रमाणे तृतीय वर्ष कु. अन्सारी हाजरा निहाल (७६ टक्के) प्रथम, सन कौसर अख्तर हुसेन (७३ टक्के), द्वितीय तर सना कौसर शेख उस्मान (७२.५१ टक्के) तृतीय क्रमांक. द्वितीय वर्षात तहरा फिरदौस अब्दुल करीम (७७ टक्के) प्रथम, फातेमा जावेद (७६ टक्के) द्वितीय तर सिद्रा कौसर मोह. सईद (७५ टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच प्रथम वर्ष कला शाखेत मारीया किब्तीया अल्ताफ अह. (८७ टक्के), अर्शिया मोहंमद रफीक (८३ टक्के) द्वितीय तर तय्यबा मोह. आमिन (८२ टक्के) गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. प्रास्ताविक प्रा.सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. हारुण अन्सारी, मुन्वर अन्सारी, रुबिना सत्तार, प्रा. कनिझ लोधी, डॉ. सलमा सत्तार, डॉ. साजेदा शेख उपस्थित होते.

Web Title: Facies de by JAT english department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.