नाशिकमध्ये जेसीबी, पोकलन सेवा दरांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:10 PM2018-02-17T15:10:26+5:302018-02-17T15:12:18+5:30

दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर व वाढती महागाई यामुळे जेबीसी व पोकलेनचा व्यवसाय करणे अवघड

Expansion in JCB, Poklon service rates in Nashik | नाशिकमध्ये जेसीबी, पोकलन सेवा दरांमध्ये वाढ

नाशिकमध्ये जेसीबी, पोकलन सेवा दरांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्देदिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर व वाढती महागाई यामुळे जेबीसी व पोकलेनचा व्यवसाय करणे अवघडआता दरवाढीनंतर जेसीबीचा दर हा ९०० रु पये प्रती तास करण्यात आला असून पोकलेनचा दर हा १८०० रु पये


नाशिक- नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनच्या वतीने जेसीबी व पोकलेनधारकांची बैठक होऊन त्यात दरवाढीचा निर्णय जाहिर करण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर व वाढती महागाई यामुळे जेबीसी व पोकलेनचा व्यवसाय करणे अवघड होत असल्याचा सुर यावेळी व्यक्त करण्यात आला. या व्यवसायात येणाºया अडचणी, येणारा खर्च आदिंविषयी चर्चा करण्यात आली. सध्या जेसीबीसाठी तासाला साधारणत: ७०० ते ७५० रु पये आकारले जात असून पोकलेन साठी साधारणत: १६०० रु पये घेतले जातात. मागील सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून हाच दर निश्चित करण्यात आलेले आहे. मात्र आता दरवाढीनंतर जेसीबीचा दर हा ९०० रु पये प्रती तास करण्यात आला असून पोकलेनचा दर हा १८०० रु पये करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यावेळी संजय फडोळ, ओमप्रकाश नारंग, दिपक भोसले मधु जकोटा अब्बास मुजावर व नाशिक शहर व जिल्हयातून सभासद उपस्थित होते.

Web Title: Expansion in JCB, Poklon service rates in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.