उद्््घाटनाआधीच मुकणे कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:54 AM2019-03-18T01:54:31+5:302019-03-18T01:54:46+5:30

शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर त्याचे अनुषंघिक काम झाल्यानंतर ती तातडीने कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही लोकार्पण सोहळे न करताच योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे.

The execution already executed before the launch | उद्््घाटनाआधीच मुकणे कार्यान्वित

उद्््घाटनाआधीच मुकणे कार्यान्वित

googlenewsNext

नाशिक : शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर त्याचे अनुषंघिक काम झाल्यानंतर ती तातडीने कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही लोकार्पण सोहळे न करताच योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे.
नाशिक शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने मुकणे धरणातून थेट जलवाहिनीची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत नाशिक शहरापासून सोळा किलोमीटर दूर असलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. सदरची योजना गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात पूर्णत्वास येणे आवश्यक होते. परंतु काम अपूर्ण असल्याने मुख्य म्हणजे मुकणे धरणात पाणी असल्याने जलविहिरीचे काम रखडले होते. त्यानंतर विल्होळीपर्यंतच जलवाहिनीचे काम रखडले होते तेदेखील पूर्ण होणे बाकी होते. ते पूर्ण झाल्यानंतरदेखील अनेक अनुषंगिक कामे बाकी होती. ती पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डिसेंबर महिन्यात योजनेची पाहणी केल्यानंतर मार्च महिन्यात प्रत्यक्ष धरणातून पाणी आले पाहिजे, असे संबंधित ठेकेदारास बजावले होते. त्यानंतर योजना पूर्ण झाली आणि धरणातून पाण्याचा उपसा करून पाइपलाइनमध्ये कुठे गळती आहे काय किंवा अन्य त्रुटी शोधण्याचे काम सुरू होते.
बुधवारी (दि. १३) रात्री सदरचे पाणी विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर या केंद्राची चाचणीदेखील करण्यात आली. परंतु कोठेही कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. त्यामुळे योजनेची यशस्वीरीत्या चाचणी झाली आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेवर ताण वाढत असून, पाणीपुरवठा कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी शहर अभियंता सुनील खुने, उत्तम पवार, अधीक्षक अभियंता रमेश पवार या माजी अधिकाऱ्यांबरोबरच विद्यमान अभियंता शिवाजी चव्हाणके, अ. वि. धनाईत, सी. बी. आहेर अशा अनेक अधिकाऱ्यांनी त्यासाठी काम पाहिले आहे.
तथापि, स्काडा मीटर बसविणे आणि अन्य जोडणीची कामे करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ते झाल्यानंतर सुमारे पंधरा ते वीस दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे.

Web Title: The execution already executed before the launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.