माजी विद्यार्थ्यांनी केली शाळेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 07:03 PM2019-03-07T19:03:36+5:302019-03-07T19:04:48+5:30

लोहोणेर : आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतो हेही नसे थोडके! देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेप्रती आदर व्यक्त करीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला.

Ex-students help school | माजी विद्यार्थ्यांनी केली शाळेला मदत

माजी विद्यार्थ्यांनी केली शाळेला मदत

Next
ठळक मुद्दे लोहोणेर : व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकच्याद्वारे जमले सर्व एकत्र

लोहोणेर : आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतो हेही नसे थोडके! देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेप्रती आदर व्यक्त करीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला.
या मित्र मंडळींना कोणताही स्वार्थ नव्हता इच्छा फक्त एकच होती. ज्या शाळेत आम्ही शिकलो मोठे झालो, त्या शाळेप्रती काही देणे लागतो या भावनेतून गिरीश भदाणे, गिरीश मोरे, निखिल कापडणीस, माधुरी देसले, अमित कदम, गजेंद्र बागुल, नीलेश सोनवणे, विपुल पगार, फरीद शेख, श्रीकांत औंधकर, अतुल सिंग, ज्ञानेश्वर कवडे, हर्षल चव्हाण, समाधान भदाणे, चंद्रशेखर निकम, संगीता समुद्र, सुजाता देशमुख, स्मिता परदेशी आदि माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आदि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येवून हा उपक्रम राबविला.
या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे ४० हजार रु पये किंमतीची सी सी टीव्ही यंत्रणा आपल्या जनता विद्यालयात कार्यान्वित करून दिली. त्यांच्या या औदार्याबद्दल मविप्र संस्थेचे संचालक डॉ. विश्राम निकम, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल आहेर, भैय्यासाहेब देशमुख मुख्याध्यापक रवींद्र भदाणे आदींनी कौतूक केले.

Web Title: Ex-students help school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.