मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात 'इशरे' च्या विद्यार्थी विभागाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 04:55 PM2018-02-17T16:55:49+5:302018-02-17T17:30:47+5:30

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या यांत्रिकी विभागातर्फे इंडियन सोसायटी फॉर हिट,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग च्या विद्यार्थी विभागाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

Establishment of "Escher" student department at Matoshree Engineering College | मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात 'इशरे' च्या विद्यार्थी विभागाची स्थापना

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात 'इशरे' च्या विद्यार्थी विभागाची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देमातोश्री महाविद्यालयात 'इशरे' ची स्थापना प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेणे आवश्यक प्राचार्य डॉ.गजानन खराटे यांचे प्रतिपादन

नाशिक : मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या यांत्रिकी विभागातर्फे इंडियन सोसायटी फॉर हिट,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग च्या विद्यार्थी विभागाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी इशरे (इंडियन सोसायटी फॉर हिट,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग) नाशिक लोकल च्यापटर चे अध्यक्ष अमर ग्रोवर,सचिव केशव अष्टेकर, नितीन केळुस्कर, धनंजय मिश्री,सुरेश दीडमिशे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन खराटे,उप प्राचार्य डॉ.वर्षा पाटील,यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.जयंत भंगले,प्रा.विकास दौंड व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना अमर ग्रोवर यांनी सांगितले की भारतात रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग या क्षेत्रात संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. जग बदलत असून शिक्षणाच्या पद्धतीही बदलणार आहे. औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षा वाढत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेणे आवश्यक बनले आहे, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे मत मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ.गजानन खराटे यांनी व्यक्त केले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर 'इशरे' चे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.विकास दौंड यांनी विद्यार्थी विभाग स्थापने मागची उद्दिष्टे सांगितली.प्रा.जयंत भंगाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.यानंतर विद्यार्थी कार्यकारणी निवडून त्यांना संस्थेच्या कामाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली.यानंतर सुरेश दीडमिशे यांनी रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग क्षेत्रातील चालू घडामोडी चा आढावा घेतला.विद्यार्थी अंकुश माझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Web Title: Establishment of "Escher" student department at Matoshree Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.