राज्यात रमजान ईदचा उत्साह!

By admin | Published: June 26, 2017 12:31 PM2017-06-26T12:31:47+5:302017-06-26T12:31:47+5:30

आज राज्यभरात रमजान ईदचा उस्ताह बघायला मिळतो आहे.

The enthusiasm of Ramadan Id in the state! | राज्यात रमजान ईदचा उत्साह!

राज्यात रमजान ईदचा उत्साह!

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 26- आज राज्यभरात रमजान ईदचा उस्ताह बघायला मिळतो आहे. पहाटेपासून राज्यात ठिकठिकाणी नमाज अदा केली जाते आहे. तसंच नमाज पठणनंतर मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोलापूरमध्ये आज सकाळपासून विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. सोलापूरमध्ये हंफिया ट्रस्ट येथे आज लाखो मुस्लिम बांधवानी रमजान ईदची ईदुल फितरची नमाज अदा केली.  या ठिकाणी ईदुल फितरची नमाज पठणासाठी लाखो मुस्लिम बांधव जमतात तर मनपा आणि पोलिस प्रशासनच्यावतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याच चीफ ट्रस्टी हाजी ख्वाजा क़ुतुबशेख अहमद मुल्ला यांनी सांगितलं. 
तर नाशिकमध्ये सोमवारी मुस्लीम बांधवांनी सामूहिकरित्या ऐतिहासिक शहाजहानी इदगाह मैदानावर  खतीब ए शहर हिसमुद्दीन अश्रफी यांच्या नेतृत्वामध्ये ईदच्या विशेष नमाजचं पठण केलं. यावेळी धर्मगुरूंनी देशप्रेम कायम ठेवून भारताच्या प्रगती व एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. सांगलीमध्येसुद्धा रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. 
मालेगावमध्ये शहराच्या मुख्य ईदगाह येथे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नमाज अदा केली. यावेळी राष्ट्रीय एकात्मता समिती व शांतता समितीच्यावतीने मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त संगीता धायगुडे, तहसीलदार सुरेश कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे, केवळ हिरे, निखिल पवार, डॉ राजेंद्र ठाकरे, रियाज अन्सारी यांच्यासह समितीचे सदस्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 

Web Title: The enthusiasm of Ramadan Id in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.