अतिक्रमित चौकी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:41 AM2019-06-19T01:41:23+5:302019-06-19T01:41:42+5:30

मालेगाव शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे.

The encroachment was removed | अतिक्रमित चौकी हटविली

मालेगावी सरदार चौकातील अतिक्रमण हटविताना मनपाचे कर्मचारी

Next

मालेगाव : शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे.
चौकात रस्त्याच्या मध्यभागी पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका उभी असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी केली होती. याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सरदार चौकातील अतिक्रमित पोलीस चौकी व रुग्णवाहिका जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली.
सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे राजू खैरनार, अधीक्षक दीपक हातगे, प्रभाग अधिकारी किशोर गिडगे व पथकाने केली. अतिक्रमण हटविल्याने सरदार चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.

Web Title: The encroachment was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.