अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

By Admin | Published: November 18, 2015 11:52 PM2015-11-18T23:52:02+5:302015-11-18T23:52:48+5:30

महात्मानगरला मोहीम : दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Encroachment kills the employee of the elimination squad | अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी महात्मानगर आणि उंटवाडी रोडवरील संभाजी चौकात दुकानमालकांनी अनधिकृतपणे उभारलेले बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली. कारवाई सुरू असतानाच महात्मानगर येथे दुकानमालक नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला विरोध करत एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने महापालिकेने बिंद्रा यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या पश्चिम विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी सकाळी उंटवाडी रोड परिसरातील संभाजी चौकात पोकार रेसिडेन्सी या इमारतीत आर. सी. बाफना ज्वेलर्स यांनी अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने आपला मोर्चा महात्मानगर येथे वळविला आणि मोना चेंबर्स को-आॅप. सोसायटीच्या इमारतीत सामासिक अंतरात नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड हटविले. याचवेळी दुकानाचे अनधिकृत बांधकामही हटविण्यात येऊन साहित्यही जप्त करण्यात आले. मोहीम सुरू असतानाच दुकानमालक नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला विरोध केला, शिवाय जीवन ठाकरे या कर्मचाऱ्यास मारहाणही केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून महापालिकेने दुकानमालक बिंद्रा यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
महापालिकेने महात्मानगर येथेच रमेश चेणाणी यांच्या दुकानासमोरील पत्र्याचे शेडही उद्ध्वस्त केले. या मोहिमेत पश्चिमच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक अधीक्षक जी. जे. गवळी, यू. डी. जाधव, एस. यू. पगार, नगररचनाचे सहायक कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांच्यासह महापालिकेचे ५० कर्मचारी आणि २० पोलीस सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment kills the employee of the elimination squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.