अतिक्रमण विभागाचा वंचितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:21 PM2019-02-23T23:21:32+5:302019-02-24T00:02:09+5:30

शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते.

 The encroachment department's depiction | अतिक्रमण विभागाचा वंचितांना आधार

अतिक्रमण विभागाचा वंचितांना आधार

Next

नाशिक : शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते. त्यामुळे दरवेळी रोषाचा धनी ठरणारे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून मात्र वेगळीच समाजसेवा केली जात आहे. जप्त केलेला भाजीपाला आणि अन्य साहित्य नाशिकमधील निराधार आणि वंचितांच्या संस्थेसाठी मदत म्हणून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चर्चेशिवाय ही मदत दिली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या दृष्टीने नाराजीचा विषय असलेले हा विभाग मात्र सेवाभावी संस्थांच्या दृष्टीने कृतज्ञतेची भावना वाढविणारा ठरत आहे.
अतिक्रमण विभाग हा शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करीत असला तो कायम वादाच्या भोवऱ्यात असतो.  कधी अतिक्रमण हटवले नाही म्हणून नागरिक चिरिमिरीचे आरोप करतात, तर कधी अतिक्रमण हटविल्यानंतर फेरीवालेही त्यांच्यावर आरोप करतात. त्यात प्रमुख तक्रार जप्त केलेल्या मालाची असते. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करताना भाजीपाला, फळे जप्त करतात, त्यावर आराडाओरड होते.  कित्येकदा जप्त मालाचे पुढे  काय होते  याविषयी सामान्य नागरिकांनादेखील कुतूहल किंवा शंका असते. मात्र, नाशिक महापालिकेच्या वतीने हा माल शहरातील विविध सेवाभावी संस्था तसेच वंचितांचा सांभाळ करणाºया संस्था तसेच शासकीय वसतिगृहांना दिला जातो.
गरजवंतांकडून कृतज्ञता...
शहरातील अभिक्षणगृह (रिमांडहोम), रमाबाई आंबेडकर वसतिगृह, त्याचप्रमाणे वृद्धाश्रम, अंध-अपंगांचा सांभाळ करणाºया संस्था यांना हा माल दिला जातो आणि किती तसेच कोणता माल दिला, याबाबतदेखील लेखी घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अशाप्रकारची मदत दिली जात असून, त्यासंदर्भातील नोंदी दफ्तरी दाखल असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले. महापालिकेच्या या सहकार्यामुळे अनेक गरजवंत आणि वंचितांना आधार मिळतो.

Web Title:  The encroachment department's depiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.