मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा अधिक वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:29 AM2017-12-10T04:29:50+5:302017-12-10T04:30:07+5:30

नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

 Emergency landing of Chief Minister helicopter, weighing more than capacity | मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा अधिक वजन

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा अधिक वजन

Next

नाशिक : नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हेलिकॉप्टरची इंधनाची टाकी पूर्ण भरलेली होती. त्यातच मुख्यमंत्र्यांचे खानसामा (कुक) सोबत असल्याने अधिक वजन झाले. पायलटने २० फुटावरून हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले व खानसामाला उतरवून १५ मिनिटांनी मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले. याआधी तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अतिवजनाने तर तांत्रिक बिघाडाने टेक आॅफनंतर खाली उतरावे लागले आहे.
शुक्रवारी नंदुबारची जाहीर सभा आटोपण्यास उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्री रात्री कारने नाशिकला आले होते. ते तेथेच मुक्कामी थांबले होते. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे कार्यसन अधिकारी अभिमन्यू पवार व खानसामा सतीश कानेकर व दोन पायलट असे सहा जण हेलिकॉप्टरमध्ये होते.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर २५ मे रोजी लातूरमध्ये टेक आॅफ केल्यानंतर सुमारे २५ फुटांवरून कोसळले होते.
७ जुलै रोजी रायगड येथे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी मुख्यमंत्री जात असतानाच त्याने टेक आॅफ केले होते.

गंभीर मुद्दा नव्हे...

इंधनाच्या समस्येमुळे चारच प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. त्यांचे हेलिकॉप्टर सहा प्रवासी क्षमतेचे होते. फडणवीस व महाजन यांच्यासह तीन प्रवाशांना घेऊन औरंगाबादचा हवाई प्रवास करणे सुरक्षित राहील, असा निष्कर्ष पायलटने काढल्यामुळे त्यांनी विनंती करत हेलिकॉप्टर पुन्हा उतरविले. फडणवीस यांच्यासह महाजन व पायलट सुखरूप औरंगाबादला पोहचले. हा दैनंदिन सरावाचा भाग असून इतका गंभीर मुद्दा नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
 

Web Title:  Emergency landing of Chief Minister helicopter, weighing more than capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.